मराठी बातम्या  /  बिझनेस  /  UPI Lite : यूपीआय लाइटद्वारे करता येणार ‘इतक्या’ रुपयांचा व्यवहार; RBI ची घोषणा

UPI Lite : यूपीआय लाइटद्वारे करता येणार ‘इतक्या’ रुपयांचा व्यवहार; RBI ची घोषणा

Aug 10, 2023, 06:48 PM IST

  • RBI on UPI Lite : रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात यूपीआय संदर्भात तीन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्याचा ग्राहकांना कसा फायदा होईल ते जाणून घेऊया.

UPI HT

RBI on UPI Lite : रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात यूपीआय संदर्भात तीन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्याचा ग्राहकांना कसा फायदा होईल ते जाणून घेऊया.

  • RBI on UPI Lite : रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात यूपीआय संदर्भात तीन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्याचा ग्राहकांना कसा फायदा होईल ते जाणून घेऊया.

RBI on UPI : आज रिझर्व्ह बँकेने तिमाही पतधोरणात रेपो दर कायम ठेवतानाच यूपीआयसंदर्भातही मोठे निर्णय घेतले आहेत. आरबीआयने यूपीआय लाईटवरील व्यवहार मर्यादा वाढवली आहे. तसेच आॅफलाईन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. यूपीआय पेमेंट व्यवहारात वाढ करण्याच्या उद्देशाने गव्हर्नन्सनी या महत्वपूर्ण घोषणा केल्या.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

यूपीआय लाईटची मर्यादा वाढली

यूपीआय लाईटमधील व्यवहार मर्यादा रिझर्व्ह बँकेने ५०० रुपये केली आहे. याआधी ती २०० रुपये होती. युपीआय लाइट नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि आरबीआयने सप्टेंबर २०२२ मध्ये लॉन्च केले होते.

आॅफलाईन पेमेंटचा वापर

लवकरच यूपीआय आॅफलाईन पेमेंट व्यवहारही करता येणार आहेत. त्यासाठी निअर फिल्ड टेक्नाॅलाॅजीचा वापर केला जाणार आहे.

कन्वर्सेशनल पेमेंट्सचीही सुविधा

नव्या निअर फिल्ड टेक्नाॅलाॅजीचा वापर करुन UPI मध्ये कन्व्हर्सेशनल पेमेंटची सुविधाही सुरू केली जाण्याचा प्रस्ताव आहे. ज्यामुळे यूजर्सना पेमेंट करण्यासाठी एआय सक्षम प्रणालींमध्ये गुंतण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) लवकरच ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी करण्याची शक्यता आहे.रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे देशात डिजीटल पेमेंट प्रणालीचा वापर मोठ्या संख्येने वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितले.

विभाग

पुढील बातम्या