मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ratan Tata tweet : रतन टाटांनी केलं ट्विट, मान्सूनमध्ये तुमची गाडी स्टार्ट करण्यापूर्वी 'हे' काम नक्की करा

Ratan Tata tweet : रतन टाटांनी केलं ट्विट, मान्सूनमध्ये तुमची गाडी स्टार्ट करण्यापूर्वी 'हे' काम नक्की करा

Jul 04, 2023, 04:08 PM IST

    • Ratan Tata tweet : उद्योगपती रतन टाटांच्या एका ट्विटने त्यांच्यातील मानवता पुन्हा एकदा दिसून आली आहे. मान्सून सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तमाम भारतीयांना एक अपील केलंय.
Ratan Tata tweet HT

Ratan Tata tweet : उद्योगपती रतन टाटांच्या एका ट्विटने त्यांच्यातील मानवता पुन्हा एकदा दिसून आली आहे. मान्सून सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तमाम भारतीयांना एक अपील केलंय.

    • Ratan Tata tweet : उद्योगपती रतन टाटांच्या एका ट्विटने त्यांच्यातील मानवता पुन्हा एकदा दिसून आली आहे. मान्सून सुरु झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तमाम भारतीयांना एक अपील केलंय.

Ratan Tata tweet : देशातील उद्योगपती रतन टाटा यांनी आज एक ट्विट केलयं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना मार्मिक अपील केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबईच्या पावसात रस्त्यावर राहणाऱ्या कुत्रे आणि मांजरांकडे लक्ष देण्याचे अपील केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी भटके कुत्रे आणि मांजरांबद्दल मानवता दाखवण्यास सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Ratan Tata आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आता मान्सूनचे दिवस सुरु झाले आहेत. अशा वेळी अनेक भटकी कुत्री मांजरी गाड्यांच्या खाली आपला निवारा (शेल्टर) शोधतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली गाडी स्टार्ट करण्यापूर्वी एकदा खाली तपासा. जेणेकरुन एखाद्या कुत्र्यामांजराला इजा पोहोचणार नाही. जर असं नाही केलं तर त्याला गंभीरपणे दुखापत होऊ शकते. हे प्राणी कायमस्वरुपी विकलांग होऊ शकतात. किंबहुना त्यांची उपस्थिती न कळल्यास त्यांचा मृत्यूही ओढवू शकतो. त्यामुळे मान्सूनच्या दिवसात या प्राणांसाठी आपण सर्वांनीच तात्पुरते शेल्टर देण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.

रतन टाटा रस्त्यावर राहणाऱ्या प्राण्यांबद्दल खूप संवेदनशील आहेत आणि यापूर्वीही त्यांनी मदत केल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. त्यांचे सहाय्यक शंतनू नायडू यांचाही भटक्या कुत्र्यांशी संबंध आहे आणि त्यांनी या भटक्या कुत्र्यांसाठी काम केले आहे. शंतनू नायडू यांनी केलेले हे काम टाटा ग्रुप ऑफ कंपनीजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते.

रतन टाटा हे श्वानप्रेमी म्हणून आधीच लोकप्रिय असले तरी त्यांचे ताजे ट्विट हे भटके कुत्रे आणि मांजरींबाबत अजूनही संवेदनशील असल्याचे उदाहरण आहे.

विभाग

पुढील बातम्या