मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ratan Tata Birthday : ८६ वर्षांचे झाले रतन टाटा! त्यांचे 'हे' अनुभवाचे बोल देतील जीवनाला दिशा

Ratan Tata Birthday : ८६ वर्षांचे झाले रतन टाटा! त्यांचे 'हे' अनुभवाचे बोल देतील जीवनाला दिशा

Dec 28, 2023, 01:24 PM IST

  • Happy Birthday Rata Tata : प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे आज ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्तानं जाणून घेऊया त्यांचे अनुभवाचे बोल… 

Ratan Tata

Happy Birthday Rata Tata : प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे आज ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्तानं जाणून घेऊया त्यांचे अनुभवाचे बोल…

  • Happy Birthday Rata Tata : प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे आज ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या निमित्तानं जाणून घेऊया त्यांचे अनुभवाचे बोल… 

Ratan Tata Birthday News in Marathi : भारतीय उद्योगविश्वात विश्वासाचं समांतर नाव असलेल्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व प्रख्यात उद्योगपती रतन टाटा हे आज वयाची ८६ वर्षे पूर्ण करत आहेत. या निमित्तानं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत नेवल टाटा आणि सूनी टाटा यांच्या घरात झाला. टाटा समूहाचा पसारा त्यांनी यशस्वीरित्या केवळ सांभाळलाच नाही, तर तो वाढवला. उद्योगाचा व्याप वाढवताना त्यांनी कधी मूल्यांचा विसर पडू दिला नाही. त्यामुळंच रतन टाटांना भारतीय जनमाणसांमध्ये आदराचं स्थान आहे. राष्ट्र उभारणीत अतुलनीय योगदानासाठी रतन टाटा यांना पद्म विभूषण (२००८) आणि पद्म भूषण (२०००) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

उद्योग विश्वाचं नेतृत्व करताना व एकूणच जीवन प्रवासात त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव आले. ते अनुभवाचे बोल त्यांनी अनेकदा शेअर केले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करूया.

IPO Listing News : आझाद इंजिनीअरिंगच्या शेअरची दणक्यात एन्ट्री; सचिनला किती कोटींचा फायदा झाला पाहा!

माणसाला कार्यरत ठेवण्यासाठी आयुष्यातील चढ-उतार खूप महत्त्वाचे असतात. ईसीजी रिपोर्टमधील सरळ रेषा हे मृत माणसाचं लक्षण असतं.

भौतिक गोष्टींना फारसा अर्थ नसतो हे एक दिवस तुम्हाला उमजेल. आपल्या प्रियजनांचं हित साधणं आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणं हेच महत्त्वाचं आहे.

सर्वोत्कृष्ट नेते तेच असतात, जे त्यांच्यापेक्षा हुशार सहाय्यक आणि सहकाऱ्यांसोबत राहणं पसंत करतात.

वर्क-लाइफ बॅलन्सवर माझा विश्वास नाही. काम आणि आयुष्याच्या एकरुपतेवर माझा विश्वास आहे. तुमचं काम आणि आयुष्य अर्थपूर्ण आणि परिपूर्ण बनवा. ते आपोआपच एकमेकांना पूरक ठरतील.

कुठलीही जोखीम न घेणे हीच आयुष्यातील सर्वात मोठी जोखीम असते. जोखमी न घेणे ही आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात अपयशाची हमी जणू हमीच ठरते.

‘पार्ले जी’च्या पाकिटावर चिमुकलीऐवजी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा फोटो, काय आहे प्रकरण?

आव्हानांचा सामना करताना सातत्य आणि लवचिकता ठेवा, कारण ते यशाचे मुख्य घटक आहेत.

इतरांशी संवाद साधताना दयाभाव, सहानुभूती आणि करुणेच्या शक्तीला महत्त्व द्या.

तुमचे जीवन नेहमीच आरामदायक नसते आणि जगातील सर्व समस्या तुम्ही सोडवू शकत नाही, परंतु तुमच्याकडं जे आहे आणि जे तुम्ही मिळवू शकता त्यावरचा विश्वास उडू देऊ नका. कारण आशेवर जग जगतं हे इतिहासानं सिद्ध करून दाखवलंय.

नेतृत्व म्हणजे जबाबदारी घेणं आहे, सबब सांगणं नव्हे!

संधी तुमच्याकडं चालून येतील याची वाट पाहू नका. स्वत:साठी संधी स्वत:च निर्माण करा.

विभाग

पुढील बातम्या