मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PPF interest rates : पीपीएफधारकांना झटका ! एप्रिल २०२० पासून दरवाढ नाहीच, बचत योजनांचे लेटेस्ट दर पाहा

PPF interest rates : पीपीएफधारकांना झटका ! एप्रिल २०२० पासून दरवाढ नाहीच, बचत योजनांचे लेटेस्ट दर पाहा

Jul 01, 2023, 12:07 PM IST

    • PPF interest rates : जुलै ते सप्टेंबर तिमाहीत पीपीएफ गुंतवणूकदाराना व्याजदर वाढण्याची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. गेल्या वर्षी एप्रिल २०२० मध्ये पीपीएफ योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती.
PPF HT

PPF interest rates : जुलै ते सप्टेंबर तिमाहीत पीपीएफ गुंतवणूकदाराना व्याजदर वाढण्याची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. गेल्या वर्षी एप्रिल २०२० मध्ये पीपीएफ योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती.

    • PPF interest rates : जुलै ते सप्टेंबर तिमाहीत पीपीएफ गुंतवणूकदाराना व्याजदर वाढण्याची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. गेल्या वर्षी एप्रिल २०२० मध्ये पीपीएफ योजनांवरील व्याजदरात वाढ करण्यात आली होती.

PPF interest rates : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, अर्थ मंत्रालयाने जुलै-सप्टेंबर २०२३ या तिमाहीसाठी लघु बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. या तिमाहीत पीपीएफ गुंतवणूकदारांना व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांना पुन्हा धक्का बसला आहे. सलग १३ व्या तिमाहीमध्ये सरकारने पीपीएफ योजनेवरील व्याजदरात वाढ केलेली नाही. एप्रिल २०२० मध्ये पीपीएफ योजनेवरील व्याजदरात शेवटच्या वेळी वाढ करण्यात आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अर्थ मंत्रालयाने ३० जून रोजी झालेल्या आढावा बैठकीनंतर जुलै-सप्टेंबर २०२३ तिमाहीसाठी लहान बचत योजनांच्या व्याजदरात ३० बेसिसपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत १२ प्रकारच्या बचत योजनांपैकी केवळ ३ बचत योजनांवर व्याजदर वाढवण्यात आले आहेत, तर सुकन्या, पीपीएफसह ९ बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

PPF व्याजदर सलग १३ व्या तिमाहीतही कायम

पीपीएफ गुंतवणूकदारांना जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा होती, परंतु आता ती प्रत्यक्षात आलेली नाही. जुलै-सप्टेंबरसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कोणताही बदल न केल्यानंतर आता पीपीएफचा व्याजदर केवळ ७.१ टक्के राहिला आहे. एप्रिल २०२० मध्ये शेवटच्या वेळी पीपीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून, सुमारे १३ तिमाही उ

लटून गेली आहेत, परंतु सरकार पीपीएफ गुंतवणूकदारांना वाढीव व्याजदराची आनंदवार्ता देऊ शकले नाहीत.

 

विभाग

पुढील बातम्या