मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM kisan Yojana : पीएम किसानच्या १४ व्या हप्त्यासाठी अर्ज करा! अशी करा ऑनलाइन नोंदणी

PM kisan Yojana : पीएम किसानच्या १४ व्या हप्त्यासाठी अर्ज करा! अशी करा ऑनलाइन नोंदणी

Mar 20, 2023, 07:38 PM IST

  • PM kisan Yojana 14 th Installment : जर तुम्ही पीएम किसानच्या 14 व्या हप्त्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल तर ते लवकर करा.

PM kisan Yojana HT

PM kisan Yojana 14 th Installment : जर तुम्ही पीएम किसानच्या 14 व्या हप्त्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल तर ते लवकर करा.

  • PM kisan Yojana 14 th Installment : जर तुम्ही पीएम किसानच्या 14 व्या हप्त्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल तर ते लवकर करा.

PM kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी राबवत आहे. याअंतर्गत १२ कोटींहून अधिक शेतकरी लाभ घेत आहेत. गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये योजनेच्या १३ व्या हप्त्याचे पैसे जारी करण्यात आले आहेत. आता चौदाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही आजपर्यंत पीएम किसान सन्मान निधीसाठी अर्ज केला नसेल तर लवकर करा. अर्ज करण्याची पद्धत, पात्रता अटी आणि इतर महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ.

ट्रेंडिंग न्यूज

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

पीएम किसान सन्मान निधी (पीएम किसान १२ वा हप्ता) द्वारे केंद्र सरकार लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. शेतीच्या कामात सुलभता यावी या उद्देशाने ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते.

केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत, आतापर्यंत १३ हप्त्यांमध्ये सुमारे ११.५ कोटी

शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी कर्नाटकमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदींनी पीएम किसानच्या १३ व्या हप्त्यातील १६८०० कोटी रुपये थेट ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केले होते. शेतकरी आता १४ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, हा हप्ता एप्रिल ते जुलै २०२३ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी

केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीसाठी काही पात्रता अटी निश्चित केल्या आहेत. नियमानुसार आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. तर पती-पत्नी दोघेही योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. शेतकरी पिता-पुत्र दोघेही योजनेसाठी पात्र नाहीत. त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांना योजनेचा लाभ घेता येत नाही.

विभाग

पुढील बातम्या