मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता आज येणार, ३ कोटी शेतकरी राहणार वंचित

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता आज येणार, ३ कोटी शेतकरी राहणार वंचित

Jul 27, 2023, 10:43 AM IST

    • PM Kisan Yojana : केंद्र आणि राज्य सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये बनावट प्रकार रोखण्यासाठी कडक धोरणाचा उलटा परिणाम दिसत आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होऊ लागली आहे.
PM kisan Yojana HT

PM Kisan Yojana : केंद्र आणि राज्य सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये बनावट प्रकार रोखण्यासाठी कडक धोरणाचा उलटा परिणाम दिसत आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होऊ लागली आहे.

    • PM Kisan Yojana : केंद्र आणि राज्य सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये बनावट प्रकार रोखण्यासाठी कडक धोरणाचा उलटा परिणाम दिसत आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी होऊ लागली आहे.

PM Kisan Yojana : १२ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कुटूंबांची प्रतिक्षा आता संपणार आहे. पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी २७ जुलैला आज पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता ट्रान्सफर करणार आहे.. पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळानुसार ८.५ कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात १७ हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. याचाच अर्थ आज अंदाजे साडे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.

ट्रेंडिंग न्यूज

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

DHFL Scam : ३४ हजार कोटींचा बँक घोटाळा; CBI कडून DHFL चे माजी संचालक धीरज वाधवानला अटक

highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

गुरूवारी पीएम किसान मोदी राजस्थानच्या सीकरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात विभिन्न विकास परियोजनांची सुरूवात करणार आहेत आणि राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यात युरिया गोल्ड लाँन्च करताना देशातील एक लाख पीएम किसान सन्मान योजनेचा १४ वा हप्ताही जाहीर करतील.

केंद्र आणि राज्य सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी गेल्या महिन्यात काही कठोर निर्णय जाहीर केले. या निर्णयामुळे पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. एप्रिल ते जूलै २०२२-२३ चा हप्ता ११.२७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. पण आॅगस्ट ते नोव्हेंबर २०२२-२३ मध्ये केवळ ८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा झाला. ही संख्या २०२२-२३ मध्ये ८.८० कोटी होती. याचाच अर्थ फसवणूकीच्या बाबींचा परिणाम आता दिसू लागला आहे.

असं चेक करा स्टेट्स

पीएम किसान पोर्टलवर बेनिफिशिअरी स्टेट्स पाहण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जाणून घ्यावा लागेल. त्यासाठी पोर्टलवर दिलेल्या बेनिफिअरी स्टेट्सवर क्लिक करा. तिथे तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकून कॅप्चा कोड भरावा लागेल. त्यानंतर गेट डेटावर क्लिक करा. तुमचे स्टेट्स समोर दिसेल. पीएम किसान योजनेंतर्गत ६००० रुपयांची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.

विभाग

पुढील बातम्या