मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PhonePe : फोन पे ने लाँन्च केले शेअर मार्केट ॲप; आयपीओही येणार; कसा होणार फायदा ?

PhonePe : फोन पे ने लाँन्च केले शेअर मार्केट ॲप; आयपीओही येणार; कसा होणार फायदा ?

Aug 30, 2023, 05:16 PM IST

    • PhonePe : लोकप्रिय डिजीटल पेमेंट कंपनी गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्टशी अलग झाली. आता त्यांनी एक स्टाॅक मार्केट ट्रेडिंग ॲप Share market या नावाने दाखल केले आहे. लवकरच फोनपेचा आयपीओही दाखल होऊ शकतो.
digital platform HT

PhonePe : लोकप्रिय डिजीटल पेमेंट कंपनी गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्टशी अलग झाली. आता त्यांनी एक स्टाॅक मार्केट ट्रेडिंग ॲप Share market या नावाने दाखल केले आहे. लवकरच फोनपेचा आयपीओही दाखल होऊ शकतो.

    • PhonePe : लोकप्रिय डिजीटल पेमेंट कंपनी गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्टशी अलग झाली. आता त्यांनी एक स्टाॅक मार्केट ट्रेडिंग ॲप Share market या नावाने दाखल केले आहे. लवकरच फोनपेचा आयपीओही दाखल होऊ शकतो.

PhonePe : लोकप्रिय डिजीटल पेमेंट कंपनी फोन पेने नवीन स्टाॅक ब्रोकिंग अॅप शेअऱ मार्केट नावाने दाखल केले आहे. यासोबतच कंपनीने स्टाॅक ब्रोकिंग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. याशिवाय कंपनीने आयपीओ आणण्याची तयारी केली आहे. शेअऱ ब्रोकिंग प्लॅटफाॅर्मचा वापर सहजपणे यूजर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि नफा कमावण्यासाठी केला जाईल.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

फोन पेचे सीईओ समीर निगम यांनी अधिकृतपणे कंपनी अॅप लाँन्च करत असल्याचे सांगितले. या प्लॅटफाॅर्मचे नाव शेअर मार्केट ठेवण्यात आले आहे. प्राॅडक्ट लाँन्चसहित स्वत ला मोठी फिनटेक कंपनी म्हणून सिद्ध करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीही फोनपेने पिनकोड नावाने फायनान्शिअल प्राॅडक्ट लाँन्च केले होते.

असं चालेल फोन पे चे अॅप

फोन पेकडून सादर करण्यात आलेले शेअऱ मार्केट हे स्टॅडअलोन अॅपच्या रूपात सादर करण्यात आले आहे. अशा प्रकारचे पर्याय मोबाईल प्लॅटफाॅर्मवर पहिल्यापासूनच आहेत. या अॅपमध्ये शेअऱ बाजारात गुंतवणूक करण्याशिवाय ट्रेडिंगचाही पर्याय मिळणार आहे. शेअऱ बाजार इनसाईट्सही येथे शेअर केले जातील. यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी योग्य दिशा मिळेल.

फ्लिपकार्टशी विलगीकरण

नुकतच फोन पे पालक कंपनी फ्लिपकार्टमधून विलग झाली आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी आणि आयपीओ आणण्यासाठी फ्लिपकार्टमधून विलग होणे महत्त्वाचे होते. त्यामुळे आता फोन पेचाही आयपीओ लवकरच दाखल होऊ शकतो. कंपनीचे मूल्यांकन १२ अब्ज डाॅलर्स आहे.

विभाग

पुढील बातम्या