मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PFRDA New Rules : पीएफआरडीएचा नवा नियम, एनपीएसची रक्कम काढण्यासाठी KYC अनिवार्य, ही आहे प्रक्रिया

PFRDA New Rules : पीएफआरडीएचा नवा नियम, एनपीएसची रक्कम काढण्यासाठी KYC अनिवार्य, ही आहे प्रक्रिया

Feb 24, 2023, 07:05 PM IST

    • PFRDA New Rules : पेंन्शन फंड नियामक पीएफआरडीने एनपीएसची रक्कम कराढण्यासाठी केवायसी अनिवार्य केले आहे. नवा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्याअंतर्गत अनेक दस्तावेज अपलोड करावे लागतील.
Money HT

PFRDA New Rules : पेंन्शन फंड नियामक पीएफआरडीने एनपीएसची रक्कम कराढण्यासाठी केवायसी अनिवार्य केले आहे. नवा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्याअंतर्गत अनेक दस्तावेज अपलोड करावे लागतील.

    • PFRDA New Rules : पेंन्शन फंड नियामक पीएफआरडीने एनपीएसची रक्कम कराढण्यासाठी केवायसी अनिवार्य केले आहे. नवा नियम १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्याअंतर्गत अनेक दस्तावेज अपलोड करावे लागतील.

PFRDA New Rules : पेंन्शन फंड नियमाक पीएफआरडीएने एनपीएसची रक्कम काढण्यासाठी आणि अॅन्यूटीसाठी केवायसी अनिवार्य केले आहेत. नवा नियम एक एप्रिलपासून लागू होणार आहे. याअंतर्गत अनेक दस्तावेज अपलोड करावे लागतील. पीएफआरडीने जारी केलेल्या पत्रकानुसार, त्यामुळे एनपीएसच्या सदस्यांचा त्रास कमी होणार आहे.निवृत्ती वेतनाची रक्कम काढण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. नियामकने दिलेल्या माहितीनुसार, निवृत्तीवेतनधारकांना आणि संबंधित नोडल कार्यालयांना आपल्याकडून महत्त्वाचे दस्तावेज अपलोड करुन पुढची कारवाई करावी लागेल. यात प्रत्यक्ष हार्डकाॅपी जमा करण्याची गरज नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

सध्या निवृत्तीवेतनाची रक्कम काढण्यासाठी आणि अॅन्यूटीसाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागतो. याशिवाय रक्कम काढण्यासाठी अथवा अॅन्यूटीसाठी वेगवेगळे दस्तावेज जमा करावे लागतात. ही प्रक्रिया किचकट आहे. अनेक प्रकारचे दस्तावेज जमा केल्यावर व्हेरिफिकेशनसाठीही वेळ लागतो.

हे चार दस्तावेज अपलोड करावे लागतात

- एनपीएस काढण्यासाठी फाॅर्म

- मंजूरी पत्रात दिलेली ओळख आणि पत्त्यासाठी प्रमाणपत्र

- बँक खात्याचे प्रमाणपत्र

- प्रमाण कार्डाची फोटो काॅपी

या गोष्टी ठेवा ध्यानात

संपूर्ण प्रक्रिया डिजीटल स्वरुपात करण्यासाठी एसएमएस आणि ईमेलद्वारे ओटीपी प्रमाणीकरण अथवा आधारकार्डाद्वारे ई साईन इन पर्याय निवडा. अपलोड करण्यात येणारे दस्तावेज स्पष्ट असणे गरजेचे आहे. नाव, जन्मदिवस, नाॅमिनी यांची माहिती अपलोड करण्यापूर्वी नक्की तपासा.

आत्ताची स्थिती

सध्याच्या स्थितीत सेवानिवृत्तीनंतर पैसे काढण्यासाठी अंदाजे एक महिन्यांचा कालावधी लागतो. तर अॅन्युटी घेण्यासाठी आणि त्याबदल्यात पेन्शन घेण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. नवा नियमांमुळे दोन्ही प्रक्रिया एकत्रितरित्या पूर्ण होईल. यामुळे एनपीएसधारकांना जास्त धावपळ करण्याची गरज लागणार नाही.

विभाग

पुढील बातम्या