मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : अहमदाबाद,नोएडामध्ये बदलले पेट्रोल डिझेलचे दर, पाहा आजच्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel price today : अहमदाबाद,नोएडामध्ये बदलले पेट्रोल डिझेलचे दर, पाहा आजच्या तुमच्या शहरातील दर

Sep 23, 2023, 08:29 AM IST

    • Petrol Diesel price today 23 September 2023 : शनिवारी आगरा, नोएडासहित अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये बदल ढाला आहे. जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट्स -
petrol diesel HT

Petrol Diesel price today 23 September 2023 : शनिवारी आगरा, नोएडासहित अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये बदल ढाला आहे. जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट्स -

    • Petrol Diesel price today 23 September 2023 : शनिवारी आगरा, नोएडासहित अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये बदल ढाला आहे. जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट्स -

Petrol Diesel price today 23 September 2023 : सरकारी तेल कंपन्यांनी प्रत्येक दिवशी पेट्रोल डिझेलचे दर सकाळी ६ वाजता अपडेट केले जातात. ही किंमत विविध राज्यांत आणि शहरात किंमत निश्चित केली जाते. शनिवारीही इंधनाचे रेट्स निश्चित केले जातात. आज अनेक शहरामधील दर स्थिर झाले आहेत. मात्र काही ठिकाणी किंमतीत बदल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

खनिज तेलाच्या किंमती

खनिज तेलाच्या किंमतींबाबत गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात डब्ल्यूटीआय क्रु़ड तेलाच्या आणि ब्रेंट क्रुडच्या किंमतीत बदल झाला आहे. डब्ल्यूटीआय़ क्रुडच्या किंमतींमध्ये ०.४५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. आज हे दर ९०.०३ डाॅलर्स प्रति बॅरल्सच्या घरात आहेत. तर ब्रेंट क्रुड ०.०३ टक्के घट झाली असून ९३.२७ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर ट्रेड करत आहेत.

महानगरातील किंमत

नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर, तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १०२.७४ रुपये प्रति लीटर तर डिझेल ९४.३३ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये तर डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

या शहरांमध्ये बदलले पेट्रोल डिझेलचे दर

अजमेर- पेट्रोल 40 पैशांनी स्वस्त होऊन 108.14 रुपये, डिझेल 37 पैसे प्रति लिटर 93.41 रुपये स्वस्त झाले आहे.

नोएडा - पेट्रोल ६ पैशांनी महागले असून ते ९६.६५ रुपये प्रति लीटरने विकले जात आहे, तर डिझेल ६ पैशांनी महागले असून ते ८९.८२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

आग्रा - पेट्रोल १६ पैशांनी महागले असून ते ९६.३६ रुपये झाले आहे. तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त होऊन ८९.५३ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

अहमदाबाद- पेट्रोल १५ पैसे स्वस्त होऊन ९६.४२ रुपये दराने विकले जात आहे. डिझेल १५ पैशांनी स्वस्त होऊन ९२.१७ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे.

गुरुग्राम- पेट्रोल २ पैशांनी स्वस्त होऊन ९६.९७ रुपये झाले आहे. तर डिझेल २ पैशांनी स्वस्त होऊन ८९.८४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग

पुढील बातम्या