मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे ताजे दर

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे ताजे दर

Dec 28, 2023, 07:59 AM IST

    • Petrol and Diesel Price In Your City: तुमच्या शहरातील आज पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी विकले जात आहे, याबाबत माहिती जाणून घ्या.
Check Fuel Rates In Your City (PTI)

Petrol and Diesel Price In Your City: तुमच्या शहरातील आज पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी विकले जात आहे, याबाबत माहिती जाणून घ्या.

    • Petrol and Diesel Price In Your City: तुमच्या शहरातील आज पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी विकले जात आहे, याबाबत माहिती जाणून घ्या.

Petrol and Diesel Price Today: देशातील तेल विपणन कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले जातात. दरम्यान, आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. परिणामी, उत्तराखंड, गोवा, झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढउतार दिसत आहे. इतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील प्रमुख शहर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दर किती आहेत, हे जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपयांनी आणि डिझेलची ९०.०८ रुपयांनी विक्री केली जात आहे. मुंबईत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे १०६.३१ आणि ९४.२७ रुपये मोजावे लागत आहेत. कोलकात्यात जवळपास मुंबईसारखीच परिस्थिती आहे, जिथे पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपयांनी मिळत आहे. तर, चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा भाव अनुक्रमे १०२.६३ आणि ९४.२४ रुपये इतका आहे.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे.

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलची किंमत

घरबसल्या देखील पेट्रोल आणि डिझेलची किंमत कळू शकते. ग्राहकांना फोनवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती मिळेल. इंडियन ऑइलचे ग्राहकांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव जाणून घेण्यासाठी RSP आणि शहर कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवा. बीपीसीएल ग्राहकाने RSP आणि शहर कोड लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवा. एचपीसीएल ग्राहकांनी HPPrice आणि शहर कोड लिहून ९२२२२०११२२ या क्रमांकावर पाठवावा लागेल. ग्राहकांना एसएमएसद्वारे सर्व माहिती मिळेल.

प्रत्येक शहरात दर वेगवेगळे का?

प्रत्येक शहरात पेट्रोलचे दर वेगवेगळे असण्यामागे कर एकमेव कारण आहे. राज्य सरकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने कर वसूल करतात. त्याचबरोबर महानगरपालिका आणि नगरपालिकांनाही प्रत्येक शहरानुसार कर आहे. हे शहरानुसार बदलतात, ज्यांना स्थानिक संस्था कर देखील म्हणतात.

विभाग

पुढील बातम्या