मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Shares to buy : एक रुपयाच्या शेअर्सची कमाल, बाजार ढासळत असतानाही गुंतवणूकदारांना केले मालामाल

Shares to buy : एक रुपयाच्या शेअर्सची कमाल, बाजार ढासळत असतानाही गुंतवणूकदारांना केले मालामाल

Mar 21, 2023, 11:27 AM IST

  • Shares to buy : गेल्या एक महिन्यात शेअर बाजारात ३०४३ अंशांची घसरण झाली आहे. याच कालावधीत छोट्या शेअर्सनी कमाल केली आहे. यातच शेखावती पाॅली यार्न लिमिटेडने एका आठवड्यात चांगला परतावा दिला आहे.

stocks to buy HT

Shares to buy : गेल्या एक महिन्यात शेअर बाजारात ३०४३ अंशांची घसरण झाली आहे. याच कालावधीत छोट्या शेअर्सनी कमाल केली आहे. यातच शेखावती पाॅली यार्न लिमिटेडने एका आठवड्यात चांगला परतावा दिला आहे.

  • Shares to buy : गेल्या एक महिन्यात शेअर बाजारात ३०४३ अंशांची घसरण झाली आहे. याच कालावधीत छोट्या शेअर्सनी कमाल केली आहे. यातच शेखावती पाॅली यार्न लिमिटेडने एका आठवड्यात चांगला परतावा दिला आहे.

Shares to buy : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनेक चढ उतार सुरु आहेत. अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त घट झाली. सेन्सेक्स गेल्या महिन्यात अंदाजे ३०३४ अंशांची घट झाली आहे. या काळात छोट्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या स्टाॅक्समध्ये शेखावती पाॅली यार्न लिमिटेडचा शेअर आहे.एका आठवड्यात ३० टक्के उसळी नोंदवण्यात आली आहे. एका रुपयांपेक्षा कमी पेनी स्टाॅक्समध्ये सोमवारी ८ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Stocks to buy : पुढच्या महिनाभरात १५ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात हे १० शेअर, तुमच्याकडं आहेत का?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

शेअर प्राईज हिस्ट्री

शेखावती पाॅली यार्नचा ५२ आठवड्याचा उच्चांक १.०५ रुपये आणि निचांकी ०.४५ रुपये झाली आहे. २० फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान हा शेअर्स ५० पैसे वर होता. १३ मार्चनंतर त्यात ३० टक्के वाढ नोंदवण्यात आली असून ते ६५ पैसे वर पोहोचला. दरम्यान हा पेनी स्टाॅक गेल्या सहा महिन्यात २३.५३ टक्के नुकसान झाले आहे. तर गेल्या एका वर्षात २३ टक्क्यांपेक्षा नकारात्मक परतावा दिला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत या स्टाॅक्सचे रिटर्न्स पाहता ७८ टक्के घसरण झाली आहे.

पेनी स्टाॅक्समध्ये रिस्की

भारतीय शेअर बाजारात १० रुपयांपेक्षा कमी मूल्यांच्या शेअर्सना पेनी स्टाॅक्स म्हटले जाते. पेनी स्टाॅक्सची खरेदी करणे अत्यंत धोकादायक आहे. हे स्टाॅक्स उच्च परतावा देण्यासाठी ओळखले जाते. अशा स्टाॅक्सची लिक्विडीटी कमी असते. जर पेनी स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याचा परतावा बघून गुंतवणूक करु नका. अशा स्टाॅक्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे पैसे डूबू शकतात.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या