मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Paytm Soundbox : पेटीएमनं आणलं डेबिट कार्डच्या आकाराचं साउंडबॉक्स, गाण्यांबरोबरच पेमेंट अलर्टही मिळणार

Paytm Soundbox : पेटीएमनं आणलं डेबिट कार्डच्या आकाराचं साउंडबॉक्स, गाण्यांबरोबरच पेमेंट अलर्टही मिळणार

Aug 03, 2023, 07:08 PM IST

  • Paytm Soundbox : डिजिटल व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पेटीएमनं दोन नवीन डिव्हायसेस आणली आहेत.

Paytm Soundbox

Paytm Soundbox : डिजिटल व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पेटीएमनं दोन नवीन डिव्हायसेस आणली आहेत.

  • Paytm Soundbox : डिजिटल व्यवहार अधिक सुलभ करण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पेटीएमनं दोन नवीन डिव्हायसेस आणली आहेत.

Paytm Pocket Soundbox : दुकानात किंवा फेरीवाल्यांकडं काहीही खरेदी करून डिजिटल पेमेंट केल्यानंतर अमूक-तमूक एवढे पैसे मिळाल्याची माहिती गोड आवाजात मिळते. दुकानदारांकडं असलेलं साउंडबॉक्स हा व्यवहार झाल्याचं गिऱ्हाइक आणि दुकानदाराला सांगतं. हे साउंडबॉक्स आता अधिक अद्ययावत आणि नव्या स्वरूपात उपलब्ध झालं आहे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन ९७ कम्युनिकेशननं खिशात मावेल आणि सहज हाताळता येईल अशी साउंडबॉक्स बाजारात आणली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स आणि पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स अशी ही डिव्हायसेस आहेत. हे दोन्ही साउंडबॉक्स ४ जी तंत्रज्ञानानं युक्त अशी आहेत. हे साऊंडबॉक्स डेबिट कार्डच्या आकाराचे असून खिशात सहज बसू शकतात. सतत कामात असलेल्या व्‍यापाऱ्यांना पेमेंटचे ऑडिओ पेमेंट्स ताबडतोब देण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकतात. या साऊंडबॉक्समध्ये पाच दिवस टिकणारी बॅटरी, ४जी कनेक्‍टीव्‍हीटी आणि अंधारातही स्पष्ट दिसेल अशा क्षमतेचा टॉर्चलाइट आहे.

म्युझिक साऊंडबॉक्स बहुपयोगी

पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍समध्‍ये असलेला स्‍पीकर पेमेंटबाबत नोटिफिकेशन्‍स देतो आणि ब्‍ल्‍यूटूथच्‍या माध्‍यमातून गाणी ऐकण्‍यासाठी फोनशी देखील कनेक्‍ट करता येऊ शकतो. या म्‍युझिक साऊंडबॉक्‍समध्‍ये ७ दिवसांपर्यंत टिकणारी दर्जेदार बॅटरी, ४ जी कनेक्‍टीव्‍हिटी आणि ४ वॅट क्षमतेचा स्‍पीकर आहे. तसंच, वॉइस ओव्‍हरची देखील सुविधा आहे. या सुविधेमुळं गाणं सुरू असतानाही व्‍यापाऱ्यांना पेमेंट नोटिफिकेशन्‍स ऐकता येणार आहे.

काय आहे कंपनीची भूमिका?

पेटीएमचे संस्थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी नव्या डिव्हायसेसच्या संदर्भात माहिती दिली. 'पेटीएम साऊंडबॉक्‍ससह इन-स्‍टोअर पेमेंट्समध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स व पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स ही नाविन्य आणि कल्पकतेचं प्रतीक आहेत. व्‍यापाऱ्यांचं व छोट्या व्यावसायिकांचं काम अधिक सुलभ व्हावं या उद्देशानं ही डिव्हाइस तयार करण्यात आली आहेत. पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स व पेमेंट अलर्ट्सह मनोरंजन करणारे म्युझिक साऊंडबॉक्स हे गेमचेंजर ठरतील, असा विश्वास विजय शेखर शर्मा यांनी व्यक्त केला.

पुढील बातम्या