मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Parle G : ‘पार्ले जी’च्या पाकिटावर चिमुकलीऐवजी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा फोटो, काय आहे प्रकरण?

Parle G : ‘पार्ले जी’च्या पाकिटावर चिमुकलीऐवजी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा फोटो, काय आहे प्रकरण?

Dec 28, 2023, 02:47 PM IST

  • Parle G Packet Image change News : पार्ले जी बिस्किटाचं पाकीट भलत्याच फोटोसह व्हायरल झाल्यानं सध्या चर्चेला उधाण आलं आहे. काय आहे हे प्रकरण?

Parle G Packet

Parle G Packet Image change News : पार्ले जी बिस्किटाचं पाकीट भलत्याच फोटोसह व्हायरल झाल्यानं सध्या चर्चेला उधाण आलं आहे. काय आहे हे प्रकरण?

  • Parle G Packet Image change News : पार्ले जी बिस्किटाचं पाकीट भलत्याच फोटोसह व्हायरल झाल्यानं सध्या चर्चेला उधाण आलं आहे. काय आहे हे प्रकरण?

Parle G Packet Image change : बाजारात सध्या अनेक कंपन्यांची, अनेक प्रकारची बिस्किटं मिळतात. त्यातून अनेकदा ग्राहकांचा गोंधळ उडत असतो. कोणते घेऊ आणि कोणते नको, असं ग्राहकांचं होत असतं. एका बिस्किटाच्या बाबतीत मात्र हा संभ्रम नसतो. ते म्हणजे पार्ले जी. या बिस्किटानं लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच भुरळ घातली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

पार्ले जी बिस्किट म्हटलं की एका गोंडस मुलीचं चित्र असलेला पिवळ्या रंगाचा पुडा डोळ्यासमोर येतो. मात्र, कंपनीनं नुकताच या पार्ले गर्लच्या चित्राच्या जागी एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा फोटो लावल्यानं सगळेच चकित झाले. पार्ले जीनं मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली की काय असाही प्रश्न विचारण्यात आला. मात्र, वास्तव वेगळंच आहे.

Gold Rate: नवीन वर्षात सोन्याचा भाव वाढणार की घसरणार? वाचा

झालं असं की…

ही मनोरंजक पोस्ट कंटेन्ट क्रिएटर जेरवान जे बन्शाह याच्या व्हायरल व्हिडिओला प्रतिसाद म्हणून करण्यात आली होती. बनशाह यानं एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या फॉलोवर्सना एक मजेशीर प्रश्न विचारला होता. 'तुम्ही पार्ले कंपनीच्या मालकाला भेटलात तर तुम्ही त्याना पार्ले सर, मिस्टर पार्ले की पार्ले जी म्हणाल?, असं त्यानं विचारलं होतं.

व्हिडिओ क्लिपमध्ये बन्शाह कारमध्ये बसलेला दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव आहेत. पार्श्वभूमीला अनिल कपूरच्या 'राम लखन' चित्रपटातील 'ए जी ओ जी' हे गाणं वाजत आहे. तेव्हा त्यानं हा प्रश्न विचारला. तीन दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. फॉलोवर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया त्यावर येत आहेत.

Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या पेट्रोल- डिझेलचे आजचे ताजे दर

या व्हिडिओनं पार्ले-जीचं लक्ष वेधून घेतलं आणि कंपनीही या गंमतीजमतीमध्ये सहभागी झाली. पार्ले-जीनं बन्शाहच्या अधिकृत अकाऊंटवर टिप्पणी केली, "बन्शाह जी, तुम्ही आम्हाला ओजी म्हणू शकता. 

या प्रतिक्रियेनंतर पार्ले-जीनं बिस्किटाच्या पाकिटावर नेहमीच्या चिमुकलीऐवजी मिस्टर बन्शाह यांचं हसतमुख छायाचित्र पोस्ट केलं. सोबत लिहिलं की, ‘जेव्हा तुम्ही पार्ले-जीच्या मालकाला काय म्हणून हाक मारावी असा विचार करत असाल, तेव्हा तुम्ही आम्हाला एक कप चहासोबत लागणारं आवडतं बिस्किट असं म्हणू शकता. काय म्हणता बन्शाहजी?'

बन्शाहनं देखील पार्लेच्या या कमेंटला उत्तर दिलं आहे. ‘लहानपणी पार्ले-जी बिस्किट किती आवडायचं हे त्यानं सांगितलंय.’

पुढील बातम्या