मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Diwali Sale : ओप्पोचा दिवाळी सेल सुरू; 'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सवलत

Diwali Sale : ओप्पोचा दिवाळी सेल सुरू; 'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सवलत

Oct 17, 2023, 04:46 PM IST

  • Oppo Diwali Sale : नवरात्रीचा उत्सव अद्याप संपला नसतानाच काही कंपन्यांनी दिवाळी सेलची घोषणा केली आहे. ओप्पो ही स्मार्टफोन कंपनीही त्यात आहे.

Oppo Diwali Sale

Oppo Diwali Sale : नवरात्रीचा उत्सव अद्याप संपला नसतानाच काही कंपन्यांनी दिवाळी सेलची घोषणा केली आहे. ओप्पो ही स्मार्टफोन कंपनीही त्यात आहे.

  • Oppo Diwali Sale : नवरात्रीचा उत्सव अद्याप संपला नसतानाच काही कंपन्यांनी दिवाळी सेलची घोषणा केली आहे. ओप्पो ही स्मार्टफोन कंपनीही त्यात आहे.

Oppo Diwali Sale : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नामवंत कंपन्यांनी खास ऑफर्स आणि सवलतींचा वर्षाव सुरू केला आहे. चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोनं देखील दिवाळी सेलची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

ओप्पोचा Find N3 Flip foldable स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर ओप्पोनं दिवाळी सेलची घोषणा केली आहे. ओप्पोचा हा बिग धमाका सेल २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. कंपनी आपल्या दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन्सवर १० टक्के बँक डिस्काउंट देखील देत आहे. तुम्हाला Oppo चा नवीन फोन घ्यायचा असेल तर हा सेल तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो.

ओप्पोच्या प्रीमियम स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या काही डील आणि सवलती पुढीलप्रमाणे…

OPPO Reno 10 5G

ओप्पोच्या दिवाळी सेलमध्ये OPPO Reno 10 5G हा स्मार्टफोन ३२,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफर व्यतिरिक्त या स्मार्टफोनच्या खरेदीवर ३ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे.

OPPO Reno 10 Pro 5G

Reno 10 Pro 5G हा स्मार्टफोन डिस्काउंटसह अवघ्या ३९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. १० टक्के बँक ऑफर व्यतिरिक्त या फोनवर ४ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे.

OPPO Reno 10 Pro Plus 5G

OPPO Reno 10 Pro Plus 5G हा फोन ओप्पो प्रीमियम डिव्हाइस वेबसाइटवर ५४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर १० टक्के कॅशबॅकसह ४ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळवता येणार आहे.

पुढील बातम्या