मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Navratri kanya pujan : मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नाच्या सर्व चिंता मिटतील, कन्या पूजन दिनी करा 'हे' काम

Navratri kanya pujan : मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नाच्या सर्व चिंता मिटतील, कन्या पूजन दिनी करा 'हे' काम

Oct 20, 2023, 04:13 PM IST

  • kanya pujan navratri 2023 : अष्टमी व नवमीच्या दिवशी होणाऱ्या कन्या पूजेच्या निमित्तानं आपल्या मुलींना काय भेट द्याल? वाचा!

Kanya Pujan

kanya pujan navratri 2023 : अष्टमी व नवमीच्या दिवशी होणाऱ्या कन्या पूजेच्या निमित्तानं आपल्या मुलींना काय भेट द्याल? वाचा!

  • kanya pujan navratri 2023 : अष्टमी व नवमीच्या दिवशी होणाऱ्या कन्या पूजेच्या निमित्तानं आपल्या मुलींना काय भेट द्याल? वाचा!

Sukanya Samriddhi Yojana : नवरात्रीचे नऊ दिवस देवीची उपासना करण्याची परंपरा आहे. प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे. मात्र, नवरात्रीतील अष्टमी आणि नवमीचा दिवस महिलावर्गासाठी खास असतो. या दिवशी मुलींचं पूजन करण्याची परंपरा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

नवरात्रीचं व्रत करणारे लोक अष्टमी वा नवमीच्या दिवशी कन्या पूजन करतात. देवीचे आवडते पदार्थ करून मुलींना जेवण घातलं जातं. त्याचे पाय धुतले जातात व त्यांना काही भेटवस्तू दिल्या जातात. या दिवसाच्या निमित्तानं आपल्या मुलीला काही भेट देण्याचा विचार करत असाल तर सुकन्या समृद्धी योजना हा उत्तम पर्याय ठरेल. तुमच्या मुलीच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तिच्या नावावर खाते उघडले नसेल, तर तुमच्यासाठी ही योग्य संधी आहे.

आर्थिक सल्लागार मनीष गर्ग यांनी सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे सांगताना म्हणतात, एखाद्या व्यक्तीनं मुलीच्या जन्मापासून या योजनेत वार्षिक दीड लाख रुपये म्हणजेच दरमहा १२,५०० रुपये गुंतवले तर २१ वर्षात त्यांची एकूण गुंतवणूक ३१.५० लाख रुपये होईल. सध्याचं व्याज आणि इतर लाभांसह एकूण रक्कम ७८.६५ लाख रुपये असेल. म्हणजेच एकूण परतावा ४७.१५ लाख रुपये असेल. मोदी सरकारनं १ एप्रिल २०२३ पासून सुकन्या समृद्धी योजनेच्या (SSY) व्याजदरात वाढ केली आहे. सध्या यावर वर्षाला ८ टक्के व्याज देण्यात येतं.

सुकन्या समृद्धी योजनेची विशेष वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत वर्षाला कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये खात्यात भरता येतात.
  • मुलगीच्या जन्मापासून ती १० वर्षांची होईपर्यंत हे खातं उघडता येतं. हे खातं पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये उघडता येतं.
  • एका मुलीच्या नावानं फक्त एकच खातं उघडता येतं. या खात्यातून मुलीच्या उच्च शिक्षणासाठी रक्कम काढण्याची मुभा आहे.
  • वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा मुलीचं लग्न झाल्यास खातं मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं.
  • हे खातं एका पोस्ट ऑफिस/बँकेतून भारतात कुठंही ट्रान्सफर करता येतं.
  • खातं उघडल्याच्या दिवसापासून ते २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खातं मॅच्युअर होतं.
  • सुकन्या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेवर प्राप्तीकर कायद्याच्या कलम ८० अंतर्गत वजावट मिळते.
  • प्राप्तीकर कायद्याच्या कलम १० अंतर्गत या खात्यावरील रकमेवर मिळणारं व्याज करमुक्त असतं.
  • हे खातं फक्त मुलींच्या नावेच उघडता येतं.

हेही वाचा: नेस्ले इंडियाच्या भागधारकांची दिवाळी; कंपनीनं केल्या दोन मोठ्या घोषणा

पुढील बातम्या