मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Bisleri Deal : 'टाटा'शी होणारी डील फिसकटताच बिसलेरी कंपनीचा मोठा निर्णय

Tata Bisleri Deal : 'टाटा'शी होणारी डील फिसकटताच बिसलेरी कंपनीचा मोठा निर्णय

Mar 20, 2023, 06:41 PM IST

  • Tata Bisleri Deal : बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले की, त्यांची मुलगी जयंतीच प्रोफेशनल टीमसहित कंपनी चालवणार आहे. आम्ही व्यवसाय विक्री करणार नाही. जयंती सध्या बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये उपाध्यक्ष आहे.

Jayanti Chauhan

Tata Bisleri Deal : बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले की, त्यांची मुलगी जयंतीच प्रोफेशनल टीमसहित कंपनी चालवणार आहे. आम्ही व्यवसाय विक्री करणार नाही. जयंती सध्या बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये उपाध्यक्ष आहे.

  • Tata Bisleri Deal : बिसलेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले की, त्यांची मुलगी जयंतीच प्रोफेशनल टीमसहित कंपनी चालवणार आहे. आम्ही व्यवसाय विक्री करणार नाही. जयंती सध्या बिसलेरी इंटरनॅशनलमध्ये उपाध्यक्ष आहे.

Bisleri Deal : बिसलेरी कंपनीमध्ये सध्या अनेक बदल होताना दिसत आहेत. बिसलेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान आता बाॅटल्ड वाॅटर कंपनीची कमान सांभाळणार आहे. टाटा समूहातील कंपनी टाटा कन्झ्युमर प्राॅडक्ट्सने, बिसलेरी कंपनी खरेदी करण्याची तयारी केली होती. पण आता हा करार संपुष्टात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

प्रोफेशनल टीमसहित जयंती सांभाळणार कमान

बिसलेरी इंटरनॅशनलचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी सांगितले की, जयंती आता आमच्या प्रोफेशनल टीमसहित कंपनी चालवणार आहे. आता आम्ही व्यवसाय विक्री करणार नाही. ४२ वर्षीय जयंती चौहान आता बिसलेरीमध्ये उपाध्यक्ष आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंती आता एंजेलो जाॅर्ज यांच्या अंतर्गत असलेल्या प्रोफेशनल मॅनेजमेंट टीमसह काम करणार आहे. ८२ वर्षीय रमेश चौहान आणि टाटा कन्झ्युमर कंपनीमध्ये बिसलेरी व्यवसाय विक्रीचा सौदा सुरु होता. योग्य मूल्यांकन करु न शकल्याने सध्या तरी हा करार रद्द झाला आहे.

मूल्यांकनामुळे करार रद्द

तज्ज्ञांच्या मते, मूल्यांकनाच्या मुद्दयावरुन कोणतीही असमहती नाही. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात प्रमोटर्स आपला इरादा पुन्हा बदलू शकतात. आगामी काळातही कंपनी खरेदीसाठी अनेक खरेदीदार इच्छुक असू शकतात. जयंती गेल्या काही वर्षांपासून व्यवसायात सक्रिय आहे. बिसलेरीच्या पोर्टफोलियोचा हिस्सा वेदिका ब्रँड तिच्या फोकसमध्ये आहे. टाटा कन्झ्युमरचे व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसुजा यांनी सांगितले की, अधिग्रहण कंपनीच्या वाढीतील महत्त्वपूर्ण टप्पा होता. कंपनी आता हिमालयन, टाटा काॅपर प्लस वाॅटर, टाटा ग्लूकोच्या सध्याच्या बाॅटल्ड वाॅटर पोर्टफोलियो मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करेल .

विभाग

पुढील बातम्या