मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Rush in Saudi Arabia: सौदी अरेबियामध्ये आढळली सोन्याची भलीमोठी खाण

Gold Rush in Saudi Arabia: सौदी अरेबियामध्ये आढळली सोन्याची भलीमोठी खाण

Dec 28, 2023, 06:58 PM IST

    • सौदी अरेबियातील ‘मादेन’ या खाण कंपनीने उत्खननादरम्यान लांबच लांब तब्बल १०० किमी पट्ट्यात आणि खोल भूगर्भात सोन्याचे साठे सापडल्याचा दावा केला आहे.
Gold mine discovered in Saudi Arabia

सौदी अरेबियातील ‘मादेन’ या खाण कंपनीने उत्खननादरम्यान लांबच लांब तब्बल १०० किमी पट्ट्यात आणि खोल भूगर्भात सोन्याचे साठे सापडल्याचा दावा केला आहे.

    • सौदी अरेबियातील ‘मादेन’ या खाण कंपनीने उत्खननादरम्यान लांबच लांब तब्बल १०० किमी पट्ट्यात आणि खोल भूगर्भात सोन्याचे साठे सापडल्याचा दावा केला आहे.

मध्य पूर्वेतील सौदी अरेबिया हा देश जगभरात सर्वाधिक कच्च्या तेलाच्या विहिरीसाठी प्रसिद्ध आहे. कच्चे तेल उत्पादनामुळं मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या या देशात आता एकापाठोपाठ एक सोन्याच्या खाणी आढळून येत आहेत. सौदी अरेबियातील ‘मादेन’ या खाण कंपनीने उत्खननादरम्यान लांबच लांब तब्बल १०० किमी पट्ट्यात आणि खोल भूगर्भात सोन्याचे साठे सापडल्याचा दावा केला आहे. या कंपनीने गेल्या वर्षी २०२२ मध्ये भूगर्भात खनिजांसाठी उत्खननाद्वारे शोधमोहीम हाती घेतली होती. त्यानंतरचा हा पहिला मोठा शोध असल्याचं म्हटलं जात आहे. सौदी अरेबियाच्या मध्यभागी असलेल्या मन्सौराह मस्साराह या सोन्याच्या खाणीलगत दक्षिण दिशेला ही नवीन सोन्याची खाण सापडली आहे. मन्सौराह मस्साराह या सोन्याच्या खाणीतून २०२३ या वर्षभरात ७ दशलक्ष औंस एवढं सोनं काढण्यात आलं होतं.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

वर्षभरापूर्वी मदिना मुनव्वरामध्ये सापडले होते सोने, तांब्याचे साठे

सप्टेंबर २०२२ मध्ये सौदी अरेबियातील अल-मदीना अल-मुनव्वराह प्रांतातील भूगर्भात सोने आणि तांब्याचे मोठे साठे सापडले होते. मदिना भागातील आबा अल-राहा येथे सोन्याचे साठे तर वादी अल-फरा येथील अल-मादिक भागात मोठ्या प्रमाणावर तांब्याचे साठे सापडले होते. या शोधामुळे जगभरातील लोकांसाठी गुंतवणुकीचे नवीन मार्ग खुले होतील, असं सौदी जिओलॉजिकल सर्व्हेने ट्विट करून सांगितले होते.

 

तेलविहिरींवरील निर्भरता कमी होणार

सौदी अरेबिया आणि अरब जगतातील इतर देशांमध्ये कच्चा तेलाचे उत्पादन हाच अर्थव्यवस्थेचा कणा असतो. मात्र जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे हवामानात बदल होतोय. त्यामुळे पेट्रोल-डिझेल ऐवजी शुद्ध ऊर्जा निर्मितीसाठी नवनवीन स्त्रोत शोधली जात आहेत. अशा परिस्थितीत सौदी अरेबियामध्ये सोन्याच्या खाणीचा शोध लागल्याने भावी काळात सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेला या धातूचा मोठा हातभार लागणार आहे. सौदी अरेबियाचे नवे राजपूत्र मोहम्मद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ संकल्प सोडला असून तेलावरचं अवलंबत्व कमी करून मनोरंजन, पर्यटन, व्यापार, खनिजविक्रीसारख्या क्षेत्राद्वारे अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे.

पुढील बातम्या