मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा नवा, चकचकीत लूक पाहिला का?

Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा नवा, चकचकीत लूक पाहिला का?

Oct 27, 2023, 04:16 PMIST

New Maruti Suzuki Swift: मारुती सुझुकी कंपनी आता नवीन स्विफ्ट (मारुती सुझुकी स्विफ्ट) कार लॉन्च करणार आहे. हॅचबॅक श्रेणीतील या कारचा नवा, चकचकीत लूक आणि वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रचना आणि नवे इंजिन तुम्हाला आकर्षित करणारे आहे. 

जपानी ऑटो कंपनी सुझुकीचे ‘स्विफ्ट’ मॉडेल हे भारतात खूप लोकप्रिय आहे. भारतात मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या मॉडेलपैकी हे एक आहे. या आठवड्यात त्यांची फोर्थ जनरेशन, नवीन स्विफ्ट हॅचबॅक टोकियो मोटर शो या प्रदर्शनात मांडली होती. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही कार भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
(1 / 6)

जपानमध्ये सुरु असलेल्या ‘टोकियो मोटर शो’ या ऑटो प्रदर्शनात स्विफ्टच्या नव्या मॉडेलची संकल्पना स्वरूपात मांडण्यात आले आहे. लवकरच त्याचे उत्पादन सुरू करण्यात येईल असं सुझुकी मोटर्सकडून सांगण्यात आले. या मॉडेलच्या मूळ डिझाइनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. परंतु हेडलाइट्स आणि बंपरमध्ये थोडे बदल करण्यात आले आहे. त्यामुळे ही कार अधिक स्पोर्टी दिसते. ऑटो शोमध्ये ब्लू आणि ब्लॅक ड्युअल टोन कलरमधलं मॉडेल ठेवण्यात आले होते.
(2 / 6)

स्विफ्टच्या या नव्या आगामी मॉडेलमध्ये मागील दरवाजाच्या हँडलची जागा बदलण्यात आलेली दिसते. या मॉडेलमध्ये मागील दरवाजाचे हँडल खिडकीच्या काचेच्या खाली अधिक सोयीस्कर ठिकाणी बसवण्यात आले आहे.
(3 / 6)

सध्या बाजारात असलेली स्विफ्ट कार ही 1.2-लिटर पेट्रोल इंजिनची क्षमता असलेली आहे. नवीन कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असण्याची शक्यता आहे. कारचे नवीनतम मॉडेल हे त्याच इंजिन क्षमतेसह राहण्याची शक्यता आहे. कारमध्ये 88.76 bhp पॉवर असून आणि 113 Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. जागतिक बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध करण्यापूर्वी सुझुकी कंपनीने नवीन हॅचबॅक कारमध्ये नवीन K12 श्रेणीचे इंजिन तसेच ADAS वैशिष्ट्याचा समावेश करण्याची योजना आखली आहे. इंधन कार्यक्षमतेत आणखी सुधार करण्यासाठी हायब्रीड स्विफ्ट कारचा पर्याय उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
(4 / 6)

नवीन स्विफ्ट कारमध्ये अद्ययावत अशी केबिन असणार आहे. यात ड्युअल-टोन डॅशबोर्ड, फ्री-स्टँडिंग, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे. नवीन हॅचबॅक कारमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, सुसज्ज अशी पुढील सीट आणि हवेशीर मोकळी जागा असू शकते. यात 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस Android Auto सह वायरलेस चार्जिंग सुविधा देखील असणार आहे.
(5 / 6)

मारुती सुझुकी स्विफ्ट स्पोर्ट मॉडेलसाठी १.४-लिटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन वापरणार असल्याची शक्यता आहे. भारतात सध्या स्विफ्टमध्ये वापरल्या जाणाऱ्या इंजिनपेक्षा नवीन इंजिन अधिक मजबूत आणि शक्तिशाली असणार आहे. हे इंजिन १२७ bhp पॉवर आणि २३५ Nm पीक टॉर्क निर्माण करू शकते. ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिटशी जोडलेले असून २०० किमी प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता आहे. ही कार केवळ ९ सेकंदात शून्य ते १०० किमी प्रतितास वेग वाढवू शकते.
(6 / 6)

    शेअर करा