मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Spice Jet Insolvency : गो फर्स्टनंतर आता स्पाईसजेटवर दिवाळखोरीची टांगती तलवार, ८ मे ला होणार सुनावणी

Spice Jet Insolvency : गो फर्स्टनंतर आता स्पाईसजेटवर दिवाळखोरीची टांगती तलवार, ८ मे ला होणार सुनावणी

May 06, 2023, 05:16 PM IST

    • Spice Jet Insolvency : देशभरातील विमान वाहतूक क्षेत्रावर संकटाची मालिका वाढतच आहे. गो फर्स्टनंतर स्पाईसजेट विमान कंपनीच्या अडचणीही वाढत आहेत. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे.
spice jet ht

Spice Jet Insolvency : देशभरातील विमान वाहतूक क्षेत्रावर संकटाची मालिका वाढतच आहे. गो फर्स्टनंतर स्पाईसजेट विमान कंपनीच्या अडचणीही वाढत आहेत. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे.

    • Spice Jet Insolvency : देशभरातील विमान वाहतूक क्षेत्रावर संकटाची मालिका वाढतच आहे. गो फर्स्टनंतर स्पाईसजेट विमान कंपनीच्या अडचणीही वाढत आहेत. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे.

Spice Jet Insolvency : देशभरातील विमान वाहतूक क्षेत्रावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. गो फर्स्टनंतर स्पाईसजेट विमान कंपनीच्या अडचणीही वाढत आहेत. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) पुढील आठवड्यात स्पाईसजेट या विमान कंपनीच्या कर्जदात्याने दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

स्पाईसजेटला कर्ज देणाऱ्या आयर्लंड येथील एअरक्राफ्ट लेसर एअरकॅसल लिमिटेड कंपनीने वाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटीकडे अर्ज दाखल केला आहे. २८ एप्रिल रोजी हा अर्ज दाखल करण्यात आला होता.

८ मे रोजी सुनावणी

एनसीएलटीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, न्यायाधिकरणाचे मुख्य खंडपीठ ८ मे रोजी अर्जावर सुनावणी करणार आहे. याआधी, गो फर्स्ट या वाडिया समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीने स्वतः दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू करण्यासाठी एनसीएलटीकडे अर्ज दाखल केला होता. आर्थिक संकटात सापडल्यानंतर गो फर्स्टने हा अर्ज दाखल केला आहे, ज्यावर सुनावणी घेतल्यानंतर एनसीएलटीने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यावर, स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की या प्रकरणामुळे एअरलाइनच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. हे प्रकरण न्यायालयाबाहेर सोडवले जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विभाग

पुढील बातम्या