मराठी बातम्या  /  बिझनेस  /  National Farmers Day : स्वस्त कर्जापासून सबसिडीपर्यंत… शेतकऱ्यांना फायदा देतात या ५ सरकारी योजना

National Farmers Day : स्वस्त कर्जापासून सबसिडीपर्यंत… शेतकऱ्यांना फायदा देतात या ५ सरकारी योजना

Dec 23, 2023, 03:05 PM IST

  • National Farmers Day : आज राष्ट्रीय शेतकरी दिन. देशातील अन्नदात्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवसानिमित्त जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रमुख सरकारी योजना.

National Farmers Day

National Farmers Day : आज राष्ट्रीय शेतकरी दिन. देशातील अन्नदात्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवसानिमित्त जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रमुख सरकारी योजना.

  • National Farmers Day : आज राष्ट्रीय शेतकरी दिन. देशातील अन्नदात्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवसानिमित्त जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रमुख सरकारी योजना.

National Farmers Day : दरवर्षी २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करण्याचा आणि मानवी जीवनातील शेतकऱ्याचं महत्त्व समजावून सांगण्याचा हा दिवस आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. व्यवसायानं शेतकरी असलेल्या चरण सिंह यांनी भारतीय शेतीची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 'शेतकऱ्यांचे तारणहार' अशी त्यांची ओळख होती.

Buy or Sell : पुढच्या आठवड्यात खरेदी करा 'हे' तीन शेअर; मार्केट एक्सपर्ट सुमीत बागडिया यांचा सल्ला

भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशातील बहुसंख्य लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. साहजिकच भारत सरकार देशातील अन्नदात्यांसाठी अनेक योजना राबवते. त्यात कर्जापासून ते अनुदानापर्यंत अनेक योजनांचा समावेश आहे. जाणून घेऊया या योजनांविषयी…

पंतप्रधान पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणारी योजना आहे. यात अवकाळी पाऊस, गारपीट, भूस्खलन, वीज पडणे, वादळ, चक्रीवादळ यामुळं पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. शेतकऱ्यांच्या कराव्या लागणाऱ्या आस्मानी संकटांचा विचार करून केंद्र सरकारनं १३ जानेवारी २०१६ रोजी ही योजना सुरू केली होती.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही केंद्र सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत ही योजना चालवली जाते. या योजनेतून शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी तीन समान हप्त्यांमध्ये ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. 

IPO Market 2024 : पैसे जपून ठेवा! स्विगीपासून ओला, ओयोपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांचे आयपीओ येतायत

पीएम किसान मानधन योजना

म्हातारपणी शेतकऱ्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पंतप्रधान किसान मानधन योजना राबवते. या योजनेंतर्गत लाभार्थींना वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन म्हणून दरमहा ३००० रुपये दिले जातात. ही एक ऐच्छिक आणि अंशदानावर आधारित पेन्शन योजना आहे. यात शेतकर्‍यांना दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतात. १८ वर्षांवरील किंवा ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वयाच्या ६० वर्षांनंतर तुम्हाला मासिक ३००० रुपये किंवा वार्षिक ३६००० रुपये पेन्शन मिळते.

किसान क्रेडिट कार्ड

भारत सरकारच्या या योजनेअंतर्गत बँका किसान क्रेडिट कार्ड जारी करतात. खते, बियाणे, कीटकनाशके इत्यादी शेतीशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. मनमानी व्याज आकारणाऱ्या सावकारांकडून शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची गरज भासू नये, हा यामागील दुसरा हेतू आहे. किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत घेतलेलं कर्ज वेळेत परत केल्यास ते २ ते ४ टक्क्यांनी स्वस्त पडते.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना सिंचनासाठी व नवीन तंत्रज्ञानासाठी निधी उपलब्ध करून देते. ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर करून शेतकरी पाण्याचा अपव्यय बऱ्याच अंशी कमी करू शकतात. या योजनेमुळं शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट pmksy.gov.in ला भेट देऊ शकता.

विभाग

पुढील बातम्या