मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : आज लिस्ट होतोय मुथुट मायक्रोफिनचा आयपीओ; गुंतवणूकदारांची उत्कंठा शिगेला

IPO Listing : आज लिस्ट होतोय मुथुट मायक्रोफिनचा आयपीओ; गुंतवणूकदारांची उत्कंठा शिगेला

Dec 26, 2023, 12:59 PM IST

  • muthoot microfin IPO listing : मुथुट मायक्रोफिन कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात सूचीबद्ध होत आहे. ग्रे मार्केटमधील प्रतिसादामुळं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

IPO News

muthoot microfin IPO listing : मुथुट मायक्रोफिन कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात सूचीबद्ध होत आहे. ग्रे मार्केटमधील प्रतिसादामुळं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

  • muthoot microfin IPO listing : मुथुट मायक्रोफिन कंपनीचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात सूचीबद्ध होत आहे. ग्रे मार्केटमधील प्रतिसादामुळं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

IPO News : शेअर बाजारासाठी नवा आठवडा उद्यापासून सुरू होतोय. हा वर्षाचा शेवटचा आठवडा असून या आठवड्यात सहा नवे आयपीओ येऊ घातले आहेत. त्याचप्रमाणे काही आयपीओ लिस्ट होणार आहेत. त्यात एक मुथुट मायक्रोफिन कंपनीचा आयपीओ आहे. तब्बल १६ पट सबस्क्राइब झालेल्या या आयपीओबद्दल गुंतवणूकदारांना प्रचंड उत्सुकता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मुथुट मायक्रोफिनच्या आयपीओचं वाटप २१ डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं. या आयपीओसाठी २७७ ते २९१ रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. एका लॉटमध्ये गुंतवणूकदारांना ५१ शेअर्स मिळणार आहेत. त्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,८४१ रुपये मोजावे लागले आहेत. एका डिमॅट खात्यातून जास्तीत जास्त १३ लॉटसाठी अर्ज करता येणार होता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर १४ रुपये सवलत देण्यात आली होती.

IPOs This Week : शेअर बाजारासाठी वर्षाचा शेवटचा आठवडा धामधुमीचा; येतायत ६ नवे आयपीओ

अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ १५ डिसेंबर रोजी खुला झाला होता. या गुंतवणूकदारांच्या माध्यमातून २८५ कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत.

ग्रे मार्केटमध्ये आयपीओचा धुमाकूळ

ग्रे मार्केटमध्ये मुथुट मायक्रोफिनच्या आयपीओला जोरदार पसंती मिळत आहे. आज, म्हणजेच सोमवारी मुथूटचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये प्रति शेअर ३१ रुपये होता. लिस्टिंगच्या वेळेपर्यंत हाच ट्रेड कायम राहिल्यास कंपनीचा शेअर ३२२ रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो. तसं झाल्यास गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी १०.६५ टक्के नफा मिळण्याची शक्यता आहे.

FD Rates : चांगली बातमी! चार प्रमुख बँकांनी वाढवले एफडीवरील व्याजदर, तुमचं खातं इथं आहे का?

मुथूट मायक्रोफिन आयपीओच्या माध्यमातून ९६० कोटी रुपये उभारणार आहे. त्यासाठी कंपनीनं २.६१ कोटी नवीन शेअर्स इश्यू केले आहेत. तर, ०.६९ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलचा भाग आहेत.

 

(डिस्क्लेमर : ही केवळ कंपनी व शेअरची माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. कृपया कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्त्ज्ञांचा सल्ला घ्या.)

विभाग

पुढील बातम्या