मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : मुथुटच्या शेअरनं पहिल्याच दिवशी दिला झटका; गुंतवणूकदारांची पळापळ

IPO Listing : मुथुटच्या शेअरनं पहिल्याच दिवशी दिला झटका; गुंतवणूकदारांची पळापळ

Dec 26, 2023, 01:57 PM IST

  • Muthoot Microfin share price news : बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रात एक प्रमुख नाव असलेल्या मुथुट मायक्रोफिनच्या आयपीओनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.

IPO Listing News

Muthoot Microfin share price news : बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रात एक प्रमुख नाव असलेल्या मुथुट मायक्रोफिनच्या आयपीओनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.

  • Muthoot Microfin share price news : बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रात एक प्रमुख नाव असलेल्या मुथुट मायक्रोफिनच्या आयपीओनं गुंतवणूकदारांची निराशा केली आहे.

Muthoot Microfin IPO Listing news : मुथूट मायक्रोफिन लिमिटेडचा शेअर आज राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व मुंबई शेअर बाजारात (BSE) सूचीबद्ध झाला. आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळूनही हा शेअर घसरून लिस्ट झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांना झटका बसला. अधिक नुकसान टाळण्यासाठी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मुथुट मायक्रोफिनचा शेअर आयपीओमध्ये २९१ रुपयांना वितरित झाला होता. ग्रे मार्केटमध्ये आयपीओला पसंती असल्यानं व ११.५२ पट सबस्क्राइब झाल्यानं हा शेअर नफा मिळवून देईल असं मानलं जात होतं. प्रत्यक्षात उलट घडलं आहे. हा शेअर बीएसईवर २७८ रुपयांवर सूचीबद्ध झाला. ही किंमत मूळ किंमतींपेक्षा ४.४७ टक्क्यांनी कमी आहे. तर, एनएसईवर हा शेअर ५.३ टक्क्यांनी घसरून २७५.३० रुपयांवर सूचीबद्ध झाला. मुथूट मायक्रोफिनची लिस्टिंग सिक्युरिटीजच्या ग्रुप बी मध्ये झाली आहे.

mediclaim news : मेडिक्लेमच्या नियमांत मोठे बदल होणार; २४ तास हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार नाही?

कसं होतं आयपीओचं स्वरूप?

मुथूट मायक्रोफिनचा आयपीओ १८ डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला झाला आणि २० डिसेंबरला बंद झाला. ९६० कोटींचा हा आयपीओ ११.५२ पट सबस्क्राइब झाला. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा (QIBs) १७.४७ पट आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कोटा १३.२० पट आणि किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा कोटा (RII) 7.61 पट सबस्क्राइब झाला होता. शेअरचा दरपट्टा २७७-२९१ रुपये असा होता. एका लॉटमध्ये गुंतवणूकदारांना ५१ शेअर मिळाले होते.

मुथुट मायक्रोफिनची आर्थिक स्थिती काय आहे?

आर्थिक आघाडीवर कंपनीची स्थिती मजबूत दिसत आहे. कंपनीचा महसूल ७२ टक्क्यांनी वाढून १०४२ कोटी झाला आहे, तर सप्टेंबर २०२३ ला संपलेल्या सहा महिन्यांत नफा अनेक पटीनं वाढून २०५ कोटी झाला आहे.

कर्ज वितरणाचा आकडा पाहता मुथूट मायक्रोफिन ही भारतातील पाचव्या क्रमांकाचे बिगर बँकिंग फायनान्स कंपनी-सूक्ष्म वित्त संस्था (NBFC-MFI) आहे. दक्षिण भारतातील ही तिसऱ्या क्रमांकाची मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे. MFI मार्केट शेअरच्या बाबतीत केरळमधील सर्वात मोठे आहे आणि तामिळनाडूमधील जवळपास प्रमुख संस्था आहे. 

IPO Listing : ५५ रुपयांचा शेअर १०० रुपयांवर लिस्ट झाला! पहिल्याच दिवशी दणदणीत नफा

मार्च २०२३ पर्यंत या कंपनीचा मार्केट शेअर १६ टक्के होता. सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण कर्ज वितरणाची रक्कम १०,८७० कोटी रुपये होती. २३ सप्टेंबरपर्यंत या कंपनीचे ३१.९ लाख सक्रिय ग्राहक आहेत. भारतातील १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ३३९ जिल्ह्यांमधील १३४० शाखांमध्ये १२,२९७ कर्मचारी कंपनीची सेवा देतात.

विभाग

पुढील बातम्या