मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stocks : १,२, ३ नव्हे तब्बल १७ शेअर्स ठरले मल्टिबॅगर्स,५ महिन्यातच कमावले बक्कळ रिटर्न्स

Multibagger Stocks : १,२, ३ नव्हे तब्बल १७ शेअर्स ठरले मल्टिबॅगर्स,५ महिन्यातच कमावले बक्कळ रिटर्न्स

Aug 30, 2023, 02:30 PM IST

    • Multibagger Stocks : पीटीसी इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस, किर्लोस्कर ब्रदर्सने एप्रिलपासून आतापर्यंत जोरदार रिटर्न्स दिले आहेत.
multibagger stocks HT

Multibagger Stocks : पीटीसी इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस, किर्लोस्कर ब्रदर्सने एप्रिलपासून आतापर्यंत जोरदार रिटर्न्स दिले आहेत.

    • Multibagger Stocks : पीटीसी इंडिया फायनान्शियल सर्व्हिसेस, किर्लोस्कर ब्रदर्सने एप्रिलपासून आतापर्यंत जोरदार रिटर्न्स दिले आहेत.

Multibagger Stocks : सध्याच्या काळात परकीय गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्स आणि रिटेल गुंतवणूकदारांनी स्माॅलकॅप स्टाॅक्समध्ये जबरदस्त परतावा दिला आहे. आर्थिक वर्ष २०२३ -२३ च्या पहिल्या पाच महिन्यात १७ स्माॅलकॅप शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिला आहे. एप्रिल ते आॅगस्टपर्यंत किमान दुहेरी अंकात परतावा मिळाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये कायनॅटिक रिन्यूएबल्सचा शेअर्स पहिल्या क्रमांकावर आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात या शेअर्समध्ये आतापर्यंत सात पटीने वाढ झाली आहे. त्याच वेळी, या स्टॉकने या महिन्यात आतापर्यंत ४० टक्के परतावा दिला आहे. या शेअर्सचे बाजार भांडवल फक्त १५०० रुपये कोटी आहे.

या शेअर्सनी दिला तीन पट रिटर्न्स

ज्यूपिटर वॅगन्स, केसॉल्व्स इंडिया, एसकेएम एग प्रोडक्ट्स एक्सपोर्ट्स, प्रेसमॅन अॅडव्हर्टाझिंग, पटेल इंजीनियरिंग या शेअर्सनी २०२३-२४ मध्ये तीन पट परतावा दिला आहे.

या शेअर्सनीही दिला जबरदस्त परतावा

आपल्या गुंतवणूकदाराना जबरदस्त परतावा देणाऱ्या शेअर्सच्या यादीत पीटीसी इंडिया फाइनान्शिअल सर्विसेस, किर्लोस्कर ब्रदर्स, डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सॉल्यूशन्स, इलेकॉन इंजीनियरिंग, आईएफजीएल रिफॅक्ट्रीज, गॅबरिल इंडिया, रामकृष्णा फोर्जिंग्स, आॅथम इन्व्हेस्टमेंट्स, पराग मिल्क फूड्स, नियोजिन फिनटेक या शेअर्सचा समावेश आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे ?

या कालावधीत विविध सेगमेंटमधील कंपन्यांच्या परफाॅर्मन्समध्ये खूप फरक आहे. गेल्या तीन महिन्यात निफ्टीत केवळ ४ टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. तर स्माॅलकॅप इंडेक्समध्ये तब्बल २० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली.

तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी आज चांगला परतावा मिळण्यासाठी गुंतवणूकदारांनी स्मॉल शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर हे शेअर्स भविष्यात मिडकॅप आणि लार्ज कॅप बनू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सतर्क राहून गुंतवणूकीचा निर्णय घ्यावा.

विभाग

पुढील बातम्या