मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing : ५५ रुपयांचा शेअर १०० रुपयांवर लिस्ट झाला! पहिल्याच दिवशी दणदणीत नफा

IPO Listing : ५५ रुपयांचा शेअर १०० रुपयांवर लिस्ट झाला! पहिल्याच दिवशी दणदणीत नफा

Dec 26, 2023, 01:57 PM IST

  • motisons jewellers IPO Listing : सोने व चांदीचे दागिने खरेदी-विक्री व्यवसायातील प्रसिद्ध कंपनी मोतीसन्सचा आयपीओ आज सूचीबद्ध झाला.

Motisons Jewellers IPO Listing

motisons jewellers IPO Listing : सोने व चांदीचे दागिने खरेदी-विक्री व्यवसायातील प्रसिद्ध कंपनी मोतीसन्सचा आयपीओ आज सूचीबद्ध झाला.

  • motisons jewellers IPO Listing : सोने व चांदीचे दागिने खरेदी-विक्री व्यवसायातील प्रसिद्ध कंपनी मोतीसन्सचा आयपीओ आज सूचीबद्ध झाला.

motisons jewellers share price : मागील आठवड्यात आलेला मोतीसन्स ज्वेलर्सचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. या कंपनीनं बाजारात दणक्यात एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर बाजारात १०९ रुपयांना लिस्ट झाले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांना मजबूत नफा झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Multibagger Stock : शेअर असावा तर असा! दोन वर्षांत तब्बल १६० टक्क्यांनी वाढला, तुमच्याकडं आहे का?

SEBI on KYC : म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, सेबीनं शिथील केले 'हे' नियम

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

मोतीसन्सचे शेअर आयपीओमध्ये प्रत्येकी ५५ रुपयांना वितरित करण्यात आले होते. हा शेअर आज राष्ट्रीय शेअर बाजारात मूळ किंमतीपेक्षा ९८ टक्क्यांनी वाढून सूचीबद्ध झाला. तर, मुंबई शेअर बाजारात १०३.९० टक्क्यांनी वाढून सूचीबद्ध झाला. गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा झाला आहे.

सूचीबद्ध झाल्यानंतर घसरण

दणदणीत लिस्टिंगनंतर मोतीसन्स ज्वेलर्सचे समभाग घसरले आहेत. लिस्टिंगनंतर काही वेळातच नफा वसुली सुरू झाल्यामुळं एनएसईवर कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून १०३.५५ रुपयांवर आले आहेत. तर, बीएसईवर ३ टक्क्यांहून अधिक घसरणीसह १०० रुपयांच्या पातळीवर आले आहेत. ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचा आयपीओ लागला आहे, त्यांना पहिल्याच दिवशी शेअरमागे ५४ रुपयांचा नफा झाला आहे. मोतीसन्सच्या आयपीओची एकूण किंमत १५१.०९ कोटी रुपये होती. आयपीओ येण्याआधी कंपनीमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी ९१.६० टक्के होती, जी आता ६६ टक्क्यांवर आली आहे.

१७३ पट सबस्क्राइब झाला होता आयपीओ

मोतीसन्स ज्वेलर्सचा आयपीओ १७३.२३ पट सबस्क्राइब झाला होता. हा आयपीओ किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत १३५.६० टक्के, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ३११.९९ टक्के तर, क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) च्या श्रेणीत १३५.०१ पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी एका आणि जास्तीत जास्त १४ लॉटसाठी अर्ज करण्याची मुभा होती. किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी किमान १३,७५० रुपये गुंतवावे लागले होते. लिस्टिंगनंतर याच्या दुप्पट पैसे गुंतवणूकदारांना मिळाले आहेत.

विभाग

पुढील बातम्या