मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Milk Price Hike : वर्ष संपता-संपता सर्वसामान्यांना महागाईचा चटका; दुधाच्या दरात दोन रुपये वाढ

Milk Price Hike : वर्ष संपता-संपता सर्वसामान्यांना महागाईचा चटका; दुधाच्या दरात दोन रुपये वाढ

Dec 26, 2022, 05:53 PM IST

  • Mother Dairy Milk Price Hike : वर्ष संपता-संपता सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. मदर डेअरीनं दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.

Milk Price

Mother Dairy Milk Price Hike : वर्ष संपता-संपता सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. मदर डेअरीनं दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.

  • Mother Dairy Milk Price Hike : वर्ष संपता-संपता सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. मदर डेअरीनं दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे.

Mother Dairy Milk Price Hike : वर्ष संपता-संपता सर्वसामान्यांना महागाईचा मोठा चटका बसला आहे. मदर डेअरीनं दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, २७ डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दोन महिन्यांत झालेली ही दुसरी दरवाढ आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

 नव्या निर्णयामुळं दूध लिटरमागे २ रुपयांनी महागणार आहे. दिल्ली व आसपासच्या परिसरातील नागरिकांना या दरवाढीची झळ बसणार आहे. खर्च वाढल्याचं कारण देत कंपनीनं दरवाढीची घोषणा केली आहे. याआधी नोव्हेंबरमध्येही कंपनीने दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ केली होती.

नवे दर लागू झाल्यानंतर टोन्ड दुधाचा दर उद्यापासून लिटरमागे ५१ रुपयांवरून थेट ५३ रुपये होणार आहे. फुल क्रीम दुधाचे दर लिटरमागे २ रुपयांनी वाढवून ६६ रुपये करण्यात आले आहेत. त्याचबरोबर डबल टोन्ड दुधाचे दर ४५ रुपये प्रति लिटरवरून ४७ रुपये होणार आहेत. मात्र, गाईचं दूध आणि टोकन (बल्क वेंडेड) दुधाचे दर 'जैसे थे' ठेवण्यात आले आहेत. दुधाच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्यांच्या कौटुंबिक बजेटवर परिणाम होणार आहे. 

का वाढतायत दुधाचे दर?

यंदाच्या वर्षात मदर डेअरीनं तब्बल पाच वेळा दुधाच्या दरात वाढ केली आहे. खर्च वाढल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीच्या माध्यमातून दिल्ली शहर व एनसीआर परिसरात दररोज ३० लाख लिटरपेक्षा जास्त दुधाचा पुरवठा केला जातो.

विभाग

पुढील बातम्या