मराठी बातम्या  /  बिझनेस  /  EPFO : होळीनंतर सहा कोटी कर्मचाऱ्यांना झटका, पीएफ व्याजदर कमी होण्याची शक्यता

EPFO : होळीनंतर सहा कोटी कर्मचाऱ्यांना झटका, पीएफ व्याजदर कमी होण्याची शक्यता

Mar 06, 2023, 06:47 PM IST

  • EPFO Interest Rates : पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरासंदर्भात २५ ते २६ मार्चला ईपीएफओच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. चालू आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे.

EPFO HT

EPFO Interest Rates : पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरासंदर्भात २५ ते २६ मार्चला ईपीएफओच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. चालू आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे.

  • EPFO Interest Rates : पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरासंदर्भात २५ ते २६ मार्चला ईपीएफओच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. चालू आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे.

EPFO ; जर तुमचे पीएफ खाते असेल तर त्यावर मिळणाऱ्या व्याजाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे. पीएफ संदर्भात ईपीएफओच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक येत्या २५ ते २६ मार्च रोजी होत आहे. चालू आर्थिक वर्षात पीएफवरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पीएफवर सध्या मिळत असलेले व्याज गेल्या ४३ वर्षांतील सर्वात निचांकी पातळीवर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

सध्या ईपीएफओचे साडे सहा कोटींपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ सध्याचे ८,१ टक्के व्याजदर कायम ठेवू शकते. अथवा ८ टक्के करण्याची शक्यता आहे. इक्विटी गुंतवणूकीतील उच्च परताव्यातील शक्यतांना लक्षात ठेवून असे करण्याची शक्यता आहे. सध्या ईपीएफओ ८५ टक्के हिस्सा रोखे पर्यायामध्ये गुंतवते. यात सरकारी सिक्यूरिटीज आणि बाँन्ड्सचा समावेश आहे. बाकी १५ टक्के हिस्सा ईटीएफमध्ये गुंतवला जातो. डेट आणि इक्विटीमधून मिळालेल्या कमाईच्या आधारे पीएफचे व्याजदर निश्चित केले जाते.

पीएफवर मिळणारे व्याजदर चार दशकांपेक्षा निचांकी पातळीवर आहे. ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२१- २२ साठी व्याजदर ८.१ टक्के निश्चित केले होते. याआधी २०२०-२१ मध्ये पीएफवर ८.५ टक्के दराने व्याजदर मिळत आहे. आर्थिक वर्ष २०२० - २१ मध्ये पीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. याआधी एक वर्षांपूर्वी २०१९-२० मध्ये हे व्याजदर ८.६५ टक्क्यांवरुन ८.५ टक्के करण्यात आले आहेत.

कोट्यावधी नोकरदार वर्गावर परिणाम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफ व्याजदर ८ टक्क्यांपर्यत घटवले जाऊ शकतात. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होत आहेत. त्याआधी अनेक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे पीएफ व्याजदर मोठ्या फरकाने कमी केले जाणार नाहीत. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात घट होऊ शकते. असे झाल्यास खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यावधी लोकांना त्याचे नुकसान सहन करावे लागेल.

उच्च रकमेच्या पेंन्शनसाठी एक लाख सदस्यांनी केला अर्ज

उच्च रकमेच्या पेन्शनसाठी जमा करण्यात आलेल्या अर्जांची संख्या अंदाजे १ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. ईपीएफओने जे सदस्य १ सप्टेंबर २०१४ पासून ईपीएफओचे सदस्य होते,त्यांच्यासाठी २७ फेब्रुवारीपासून आॅनलाईन अर्ज जारी केले आहेत. आतापर्यंत ईपीएफओच्या ८८९७ सदस्यांनी उच्च रकमेच्या पेंन्शनसाठी संयुक्त पर्याय निवडला आहे. याशिवाय निवृत्त झालेल्या सदस्यांकडूनही ४ मार्चपर्यंत ९१,२५८ आँनलाईन अर्ज मिळाले आहेत. ज्या लोकांनी १ सप्टेंबर २०१४ पूर्वी उच्च रकमेच्या पेन्शनचा विचार केला नव्हता त्यांचे हे अर्ज आहेत.

विभाग

पुढील बातम्या