मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PF balance Check : PF अकाउंटमध्ये कंपनीने पैसे जमा केले की नाही, कसं चेक करायचं?

PF balance Check : PF अकाउंटमध्ये कंपनीने पैसे जमा केले की नाही, कसं चेक करायचं?

Aug 27, 2023, 02:17 PM IST

    • PF balance Check : तुमच्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहेत ते घरबसल्या पाहायचं असेल तर ही आहे सर्वात सोप्पी प्रक्रिया, जाणून घ्या.
EPFO HT

PF balance Check : तुमच्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहेत ते घरबसल्या पाहायचं असेल तर ही आहे सर्वात सोप्पी प्रक्रिया, जाणून घ्या.

    • PF balance Check : तुमच्या पीएफ खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहेत ते घरबसल्या पाहायचं असेल तर ही आहे सर्वात सोप्पी प्रक्रिया, जाणून घ्या.

PF balance Check : कर्मचारी मग तो खाजगी क्षेत्रातील असो वा सरकारी क्षेत्रात काम करणारा असो, प्रत्येकाच्या महिन्याकाठच्या पगारातील एक ठराविक हिस्सा हा भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) जमा होत असतो. पण ही रक्कम नेमकी किती जमा झाली याचा हिशोब कर्मचाऱ्यांजवळ नसतो. कारण या पीएफची रक्कम कंपनी थेट कर्मचाऱ्याच्या पगारातून वजा करून उर्वरित पगाराची रक्कम महिन्याकाठी जमा करत असते.

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

कर्मचाऱ्याच्या भविष्यातील आर्थिक तजवीजाच्या दृष्टीने ही पीएफची रक्कम अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला जमा होणारी ही पीएफची रक्कम किती टक्के आहे, हे जाणून घेण्यासाठी ईपीएफओने एक सोप्पी पद्धत जारी केली आहे. यावरूनच तुम्हाला तुमच्या पै-पैशाचा हिशोब ठेवता येतो.

मिस्ड काॅलद्वारे

पीएफ बॅलन्स तुम्हाला एका मिस्ड काॅलवरही तपासताय येतो. त्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून ९९६६०४४४२५ या नंबरवर मिस कॉल द्या. त्यानंतर काही मिनिटातच तुमच्या मोबाईलवर पीएफमध्ये जमा झालेल्या रक्कमेची माहिती मिळेल. त्यासाठी तुमचा यूएएन क्रमांक असणे आवश्यक आहे..

उमंग अॅप

उमंग अॅपद्वारे पीएफमधील रक्कम जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन उमंग अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यात तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओटीपी टाकून अॅप सुरू करा. अॅपमधील ईपीएफओ पर्यायामध्ये जाऊन पासबूक हा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम तुम्हाला कळेल.

SMS वर

पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी एसएमएस करून आपल्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून EPFOHO UAN नंबर टाईप करा. हा SMS ७७३८२९९८९९ नंबरवर पाठवा. थोड्या वेळातच तुमच्या मोबाईलवर तुमच्या पीएफ खात्यात जमा झालेली रक्कम समजेल.

विभाग

पुढील बातम्या