मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PPF सह विविध अल्प बचत योजनांचे नियम झाले शिथील; तुम्हाला कसा होणार फायदा?

PPF सह विविध अल्प बचत योजनांचे नियम झाले शिथील; तुम्हाला कसा होणार फायदा?

Nov 11, 2023, 08:43 AM IST

  • PPF SCSS new rules news : पीपीएफसारख्या अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.

Small Savings Schemes rule changes

PPF SCSS new rules news : पीपीएफसारख्या अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.

  • PPF SCSS new rules news : पीपीएफसारख्या अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.

Small Savings scheme rule changes : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसह (PPF) वेगवेगळ्या अल्प बचत खात्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्रातील मोदी सरकारनं दिवाळी भेट दिली आहे. सरकारनं या योजनांमधील गुंतवणुकीचे नियम शिथील केले आहेत. या नियम बदलांचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

केंद्र सरकारनं ७ नोव्हेंबर २०२३ रोजी या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजना, पीपीएफ व अन्य योजनांमध्ये गुंतवणूक करणं आणि त्यातील पैसे काढून घेणं अधिक सोपं झालं आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत खातेधारकांना असा दिलासा

नवीन नियमानुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेंतर्गत खातं उघडण्यासाठी आता तीन महिन्यांचा वेळ मिळणार आहे. यापूर्वी हा कालावधी एक महिन्याचा होता. या योजनेचा फायदा घेण्यासाठी सेवानिवृत्तीची रक्कम हाती पडल्यानंतर ती एक महिन्याच्या आत गुंतवावी लागत होती. मात्र, आता त्यासाठी तीन महिने मिळणार आहेत.

कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या पत्नीला अर्थसाहाय्य म्हणून मिळालेली रक्कम ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवता येणार आहे. मात्र, मृत कर्मचारी हा वयाची पन्नाशी पूर्ण केलेला असावा. राज्य आणि केंद्र अशा दोन्ही प्रकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पत्नीला हा लाभ मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतून एक वर्षाच्या आत पैसे काढायचे असल्यास ठेवीच्या एक टक्का रक्कम कापून उरलेली रक्कम खातेदाराला परत दिली जाणार आहे. याआधी एक वर्षाच्या आत पैसे काढायचे झाल्यास त्यावर मिळालेल्या व्याजावर पाणी सोडावं लागत असे. 

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असतो. यापूर्वी मॅच्युरिटीनंतर हा कालावधी केवळ एकदाच ३ वर्षांसाठी वाढवण्याची मुभा होती. मात्र, आता हा कालावधी कितीही वेळा वाढवता येणार आहे.

Muhurat Trading : मुहूर्ताचं ट्रेडिंग म्हणजे काय? हा मुहूर्त का महत्त्वाचा? यंदाची वेळ काय? जाणून घेऊया सर्व काही

पीपीएफ धारकांना नेमका काय दिलासा?

पीपीएफच्या खातेधारकांनाही सरकारनं दिलासा दिला आहे. पीपीएफ खात्याचा कालावधी १५ वर्षांचा असतो. मात्र, आता पाच वर्षांनंतर हे खाते मुदतीच्या आधी बंद करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार, खातेधारक किंवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील (पती, पत्नी, आई-वडील, मुले) व्यक्तीच्या वैद्यकीय खर्चासाठी, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा नागरिकत्व बदलल्यास मुदतीआधी खाते बंद करून पैसे काढता येणार आहेत. अर्थात,

नॅशनल सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट स्कीम  

राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजनेंतर्गत मुदतआधी पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, पाच वर्षांच्या कालावधीच्या खात्यात जमा केलेली रक्कम चार वर्षे पूर्ण होण्याआधीच काढायची असल्यास त्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्यावर लागू असलेल्या दरानं व्याज दिलं जाणार आहे.

पुढील बातम्या