मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Kisan credit card Schemes update : देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत मिळणार ३ लाख रुपये, अर्थमंत्र्यांनी दिले आदेश

Kisan credit card Schemes update : देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत मिळणार ३ लाख रुपये, अर्थमंत्र्यांनी दिले आदेश

May 06, 2023, 05:50 PM IST

    • Kisan credit card Schemes update : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण ३ लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.
farmer HT

Kisan credit card Schemes update : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण ३ लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.

    • Kisan credit card Schemes update : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पूर्ण ३ लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.

Kisan credit card Schemes update : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही शेतकरी असाल तर आता तुम्हाला केंद्र सरकारकडून पूर्ण ३ लाख रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत आता केंद्र सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांची भेट देत असून त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

अर्थमंत्र्यांनी दिले आदेश

पीएम किसान योजनेव्यतिरिक्त, सरकार शेतकऱ्यांना केसीसी योजनेअंतर्गत सुविधा देत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना लाखोंचा लाभ मिळत आहे. अर्थमंत्र्यांनी पीएम किसान सन्मानच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड जारी करण्याचे आदेश दिले होते.

आर्थिक मदत

देशातील सर्वात कमी व्याजदरात या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. दरम्यान, केसीसी कर्जाच्या रकमेत सरकारकडून सबसिडीही जाहीर केली जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमी व्याजाने पैसे मिळतात. शेतीच्या कामात गरज पडेल तेव्हा बहुतांश शेतकरी त्यातून पैसे घेतात. शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून आणि चढ्या व्याजापासून वाचवण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

४ टक्के दराने ही रक्कम उपलब्ध

किसान क्रेडिट कार्ड योजनेत देशातील शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. जर शेतकऱ्याने कर्जाची रक्कम वेळेवर परत केली तर शेतकऱ्याला व्याजदरात ३ टक्के सूट दिली जाते. म्हणजेच कर्जाच्या रकमेवर फक्त ४ टक्के व्याज शिल्लक राहते. आगामी काळात देशातील सर्व पीएम किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

३ कोटींहून अधिक शेतकरी या योजनेत सामील

जुलै २०२२ पर्यंत, सरकारच्या एका विशेष मोहिमेअंतर्गत, ३ कोटींहून अधिक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेशी जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत १८ ते ७५ वर्षे वयोगटातील व्यक्ती अर्ज करू शकतात. येत्या काही दिवसांत ही रक्कम सरकारकडून ५ लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.

विभाग

पुढील बातम्या