मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Old Pension : जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकारचं अर्थसंकल्पात मौन; मुद्दा चिघळण्याची शक्यता

Old Pension : जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकारचं अर्थसंकल्पात मौन; मुद्दा चिघळण्याची शक्यता

Mar 09, 2023, 07:32 PM IST

  • Old Pension Scheme News : महाराष्ट्र सरकारनं आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात (Maha Budget 2023) जुन्या पेन्शन योजनेबाबत मौन बाळगलं आहे.

pension HT

Old Pension Scheme News : महाराष्ट्र सरकारनं आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात (Maha Budget 2023) जुन्या पेन्शन योजनेबाबत मौन बाळगलं आहे.

  • Old Pension Scheme News : महाराष्ट्र सरकारनं आज जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात (Maha Budget 2023) जुन्या पेन्शन योजनेबाबत मौन बाळगलं आहे.

Old Pension Scheme in Maha Budget 2023 :  शिंदे - फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज साद करण्यात आला. यात राज्यातील विविध घटकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र, सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही ठोस घोषणा केली नाही. त्यामुळं येत्या काळात हा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या अधिवेशनात बोलताना राज्य सरकार जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक विचार करत असून ‘मध्यम मार्ग’ काढण्यात येईल, असं म्हटलं होतं. मात्र, अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांना जुन्या पेन्शनसंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी ही मागणी मान्य होण्याची शक्यता फेटाळून लावली होती. 'आता हे शक्य नाही. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन होईल, तेव्हाच आपण यावर विचार करू शकतो, असं ते म्हणाले होते. त्यामुळं अर्थसंकल्पात याबाबत काही घोषणा होण्याची अपेक्षा नव्हती. ते खरं ठरलं आहे. त्यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.

संपाचा इशारा

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना तातडीनं लागू करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संपाची नोटीस मंत्रालयासह प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

शासकीय सेवेत नोव्हेंबर २००५ पासून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनानं नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. ती रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मागणी आहे. सरकारनं आजपर्यंत कोणतंही सकारात्मक पाऊल उचलेलं नाही, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस आणि समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली.

विभाग

पुढील बातम्या