मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI loan rates : स्टेट बँकेच्या कर्जदारांसाठी बॅड न्यूज! कर्जाचा हप्ता वाढणार

SBI loan rates : स्टेट बँकेच्या कर्जदारांसाठी बॅड न्यूज! कर्जाचा हप्ता वाढणार

Dec 15, 2023, 02:48 PM IST

  • SBI Loan Rates News : स्टेट बँक ऑफ इंडियानं एमसीएलआरच्या दरात वाढ केल्यानं बँकेचं कर्ज महागणार आहे.

State Bank Of india (REUTERS)

SBI Loan Rates News : स्टेट बँक ऑफ इंडियानं एमसीएलआरच्या दरात वाढ केल्यानं बँकेचं कर्ज महागणार आहे.

  • SBI Loan Rates News : स्टेट बँक ऑफ इंडियानं एमसीएलआरच्या दरात वाढ केल्यानं बँकेचं कर्ज महागणार आहे.

SBI Loan Interest Rates News : स्टेट बँकेच्या कर्जदारांची चिंता वाढवणारी बातमी आहे. स्टेट बँकेनं आपल्या एमसीएलआर (Marginal Cost of Fund based lending rate) मध्ये ५ ते १० बेसिस पॉइंट्सनी वाढ केली आहे. त्यामुळं या बँकेचं कर्ज महागणार आहे. याचा फटका नव्या कर्जदारांबरोबरच सध्याच्या कर्जदारांनाही बसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीनं सलग पाचव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर स्टेट बँकेनं व्याजदरात वाढ केली आहे. नवे दर आजपासूनच लागू होणार आहेत.

PM JanDhan Yojana: बँक खात्यात पैसे नसतानाही काढू शकता १० हजार! मोदी सरकारची 'ही' योजना माहितीय का?

स्टेट बँकेनं एमसीएलआरमध्ये वाढ केल्यामुळं कर्जासाठी अर्ज करणाऱ्या नव्या ग्राहकांना अधिक दरानं कर्ज घ्यावं लागणार आहे. तर, ज्यांनी आधीच कर्ज काढलं आहे, त्यांना वाढीव दरानं भविष्यातील हप्ते भरावे लागणार आहेत. अर्थात, एमसीएलआर आधारित कर्जाच्या दरात कालांतरानं बदल होतो.

एसबीआयच्या वेबसाईटनुसार, एमसीएलआरचा नवीन दर १ महिन्याच्या कालावधीसाठी ८.२० टक्के, ३ महिन्यांच्या कालावधीसाठी ८.२० टक्के, ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ८.५५ टक्के, १ वर्षाच्या कालावधीसाठी ८.६५ टक्के, २ वर्षांच्या कालावधीसाठी ८.७५ टक्के आणि ३ वर्षांच्या कालावधीसाठी ८.८५ टक्के इतका आहे.

एसबीआयचे सुधारित एमसीएलआर दर पुढीलप्रमाणे…

सध्याचा MCLR (%) … नवा MCLR (%)

एक महिना - ८.१५ …  ८.२० 

तीन महिने - ८.१५ …  ८.२०%

सहा महिने - ८.४५ … ८.५५

एक वर्ष - ८.५५ … ८.६५

दोन वर्षे - ८.६५ … ८.७५

तीन वर्षे - ८.७५ … ८.८५

(स्त्रोत : एसबीआय बँकेचे संकेतस्थळ)

IPO News : स्मॉल कॅप कंपनीच्या आयपीओचा शेअर बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट

एसबीआय फेस्टिव्ह सीझन होम लोन ऑफर

विशेष उत्सव ऑफरच्या अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना गृहकर्जाच्या व्याजदरात ६५ बेसिस पॉईंट्सपर्यंत सवलत देते. नियमत होम लोन, फ्लेक्सीपे, एनआरआय, पगारदार, प्रिव्हिलेज, अपॉन घर वर ही सवलत लागू आहे. गृहकर्जावरील सवलतीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आहे.

पुढील बातम्या