मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Life Certificate: पेन्शनर आहात? मग ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!

Life Certificate: पेन्शनर आहात? मग ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!

Oct 03, 2022, 01:45 PM IST

  • Life Certificate: सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने खूप महत्त्वाचे असतात. या महिन्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

जीवनप्रमाणपत्र सादर करण्याची सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची लगबग

Life Certificate: सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने खूप महत्त्वाचे असतात. या महिन्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

  • Life Certificate: सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने खूप महत्त्वाचे असतात. या महिन्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी निवृत्तीनंतर आपण हयात असल्याचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र (LIFE CERTIFICATE)जमा करावे लागते. त्यानंतरच त्यांचे निवृत्ती प्रमाणपत्र जारी केले जाते. त्यामुळे वृद्धापकाळतही ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र, वय वर्षे ८० पेक्षा अधिक वय असलेल्या आजी-आजोबांना एक महिना आधीच जीवन प्रमाणपत्र भरण्याची परवानगी सरकारने दिली आहे. म्हणजेच १ आँक्टोबरपासून ते प्रमाणपत्र भरून देऊ शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

दरवर्षी लाखो केंद्रीय निवृत्त कर्मचारी बॅकांमध्ये जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करतात. मात्र आपल्या सोयीनुसार डिजिटल पद्धतीनेही ते जमा करता येते. याशिवाय परदेशात राहूनही जीवन प्रमाणपत्र भरता येऊ शकते.

अशी आहे प्रक्रिया

पेंन्शन डिसबर्स अथाँरिटीमध्ये (PDAs) प्रत्यक्षात जाऊनही लाईफ सर्टिफिकेट जमा करता येते. मात्र वाढत्या वयानुसार जर प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसतील तर त्यांना डेजिनटेड आँफिशिअलद्वारे स्वाक्षरी करता येते. यात निवृत्ती वेतन धारकांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक नाही.

निवृत्तीवेतनधारक घरी बसूनही जीवन प्रमाण पोर्टलवर जीवन प्रमाणपत्र जमा करू शकतात. आधार नियामक युआयडीने निवृत्तीवेतनधारकांसाठी बायोमेट्रिक ओळखसंदर्भात माहिती जारी केली आहे.

नोव्हेंबर २०२० मध्ये पोस्ट खात्याने डोअर स्टेप सर्व्हिसद्रवारे जीवन प्रमाण पत्र भरण्याची सुविधा सुरु केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पोस्टमॅन आणि ग्रामीण डाक सेवक यांच्याद्वारे ही सुविधा दिली जाते. मोबाईल स्टोअरद्वारे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीधारकांना गुगल प्ले स्टोअरमधून पोस्टइन्फो अॅप डाऊनलोड करावे लागेल.

देशभरातील १२ सरकारी बॅकां १०० प्रमुख शहरांमध्ये डोअरस्टेप बॅकिंग सुविधा देतात. जीवन प्रमाणपत्र जमा करणे हेदेखील यात समाविष्ट आहे. यासाठी मोबाईल अँप, संकेतस्थळ अथवा टोल फ्री क्रमांकांच्या माध्यमातून बुकिंग केली जाते. त्यानंतर डोअरस्टेप बॅकिंग एजंट घरी येऊन निवृत्ती वेतनधारकांना सेवा देऊ शकतात. परदेशात राहूनही आँनलाईनच्या माध्यामातून जीवन प्रमाण पत्र सादर करता येते.

पुढील बातम्या