मराठी बातम्या  /  बिझनेस  /  rekha jhunjhunwala : मुंबईतील पॉश भागात रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ फ्लॅट, किंमत ऐकून चक्रावून जाल!

rekha jhunjhunwala : मुंबईतील पॉश भागात रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केले १२ फ्लॅट, किंमत ऐकून चक्रावून जाल!

Mar 28, 2024, 11:12 AM IST

  • Rekha Jhunjhunwala buys 12 apartments in Mumbai : प्रख्यात गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मुंबईत तब्बल १२ अपार्टमेंट खरेदी केल्या आहेत.

रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी मुंबईतील आलिशान भागात खरेदी केले १२ फ्लॅट, किंमत ऐकून चक्रावून जाल!

Rekha Jhunjhunwala buys 12 apartments in Mumbai : प्रख्यात गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मुंबईत तब्बल १२ अपार्टमेंट खरेदी केल्या आहेत.

  • Rekha Jhunjhunwala buys 12 apartments in Mumbai : प्रख्यात गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मुंबईत तब्बल १२ अपार्टमेंट खरेदी केल्या आहेत.

Rekha Jhunjhunwala news : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मुंबईतील वाळकेश्वर भागात तब्बल १२ अपार्टमेंट्स खरेदी केल्या आहेत. तब्बल १५६ कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

वाळकेश्वर इथल्या प्रसिद्ध रॉकसाइड सोसायटीत या अपार्टमेंट्स आहेत. ही सोसायटी ५० वर्षे जुनी आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉकसाइड सोसायटीसह आजूबाजूच्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास होणार आहे. Indextap.com च्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान हे व्यवहार झाले आहेत. 

प्रत्येक अपार्टमेंटचा आकार १६०० ते २,५०० चौरस फूट आहे आणि प्रत्येक अपार्टमेंटची किंमत सुमारे १० ते १५ कोटी रुपये आहे. या व्यवहारापोटी झुनझुनवाला यांनी तब्बल ९.०२ कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरलं आहे. सर्वात अलीकडचा व्यवहार १५ मार्च रोजी झाला आहे.

झुनझुनवाला हे मुंबई शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठे गुंतवणूकदार आहेत. गेल्या वर्षी रेखा झुनझुनवाला यांची कंपनी किन्टीस्टो एलएलपीनं वांद्रे कुर्ला संकुलात ६०० कोटीमध्ये कार्यालयाची जागा खरेदी केली होती.

३७१ कोटींना खरेदी केली होती इमारत

२०२२ मध्ये किडनीच्या विकारामुळं मरण पावलेल्या झुनझुनवाला यांनी २०१३ ते २०१७ या कालावधीत रिजवे अपार्टमेंट्स नावाची एक संपूर्ण इमारत ३७१ कोटी रुपयांना विकत घेतली होती. त्यानंतर या इमारतीचं रूपांतर एक अति-आलिशान खासगी घरात करण्यात आलं होतं.

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर त्यांच्या संपूर्ण साम्राज्याची धुरा रेखा सांभाळत आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी स्टॉक मार्केटमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये रेखा झुनझुनवाला यांची शेअर बाजारातील गुंतवणूक ३९,३३३.२ कोटी इतकी आहे.

पुढील बातम्या