मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ktil ipo: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी संधी! पुढच्या आठवड्यात येतोय आणखी एक आयपीओ

ktil ipo: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी संधी! पुढच्या आठवड्यात येतोय आणखी एक आयपीओ

Nov 05, 2022, 06:44 PM IST

    • आयओटी आधारित इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी केन्झ टेक्नाॅलाॅजी इंडिया लिमिटेडचा (KTIL) आयपीओ 10 नोव्हेंबर रोजी उघडणार आहे.त्याअनुषंगाने जाणून घेऊ कंपनीबद्दल -
share market HT

आयओटी आधारित इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी केन्झ टेक्नाॅलाॅजी इंडिया लिमिटेडचा (KTIL) आयपीओ 10 नोव्हेंबर रोजी उघडणार आहे.त्याअनुषंगाने जाणून घेऊ कंपनीबद्दल -

    • आयओटी आधारित इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी केन्झ टेक्नाॅलाॅजी इंडिया लिमिटेडचा (KTIL) आयपीओ 10 नोव्हेंबर रोजी उघडणार आहे.त्याअनुषंगाने जाणून घेऊ कंपनीबद्दल -

KTIL IPO: आयओटी (IoT) आधारित इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी केटीआयएलची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) १० नोव्हेंबर रोजी उघडेल. बाजार नियामक सेबीकडे सादर केलेल्या दस्तावेजांनुसार, पब्लिक इश्यू १४ नोव्हेंबरला बंद होईल तर अँकर गुंतवणूकदार ९ नोव्हेंबरला शेअर्ससाठी बोली लावू शकतील.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

55.85 लाख इक्विटी शेअर्सची विक्री

केन्झ टेक्नॉलॉजीने इश्यू अंतर्गत जारी केल्या जाणार्‍या नवीन शेअर्सची संख्या ६५० कोटी रुपयांवरून ५३० कोटी रुपयांपर्यंत कमी केली आहे. याशिवाय, एक प्रवर्तक आणि एक विद्यमान भागधारक देखील ५५.८५ लाख इक्विटी समभागांच्या विक्रीसाठी ऑफर देईल. यामध्ये प्रवर्तक रमेश कुनिकन्नन यांच्याकडे असलेल्या २०.८४ लाख समभागांचाही समावेश असेल.

निधी कुठे वापरणार?

नवीन शेअर्सच्या विक्रीतून मिळालेली रक्कम कर्ज फेडण्यासाठी म्हैसूर आणि मानेसरमधील उत्पादन प्रकल्पांसाठी भांडवल उभारण्यासाठी आणि खेळते भांडवल उभारण्यासाठी वापरली जाईल. केन्स टेक्नॉलॉजी ही एक आघाडीची इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) आधारित इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्याचे देशभरात एकूण आठ उत्पादन प्रकल्प आहेत.

विभाग

पुढील बातम्या