मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jobs in Taiwan : तैवानमध्ये १ लाख भारतीयांना रोजगाराच्या संधी; भरघोस पगारासोबत मिळणार मेडिकल सुविधा

Jobs in Taiwan : तैवानमध्ये १ लाख भारतीयांना रोजगाराच्या संधी; भरघोस पगारासोबत मिळणार मेडिकल सुविधा

Nov 10, 2023, 05:39 PM IST

  • तैवानमध्ये कारखाने, शेती, बांधकाम प्रकल्प, घरगुती कामगार, मत्स्यव्यवसाय तसेच हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असून या क्षेत्रात सुमारे १ लाख कामगारांची गरज निर्माण झाली आहे.

job opportunity in taiwan

तैवानमध्ये कारखाने, शेती, बांधकाम प्रकल्प, घरगुती कामगार, मत्स्यव्यवसाय तसेच हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असून या क्षेत्रात सुमारे १ लाख कामगारांची गरज निर्माण झाली आहे.

  • तैवानमध्ये कारखाने, शेती, बांधकाम प्रकल्प, घरगुती कामगार, मत्स्यव्यवसाय तसेच हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असून या क्षेत्रात सुमारे १ लाख कामगारांची गरज निर्माण झाली आहे.

तैवान हा देश एक लाख भारतीयांना नोकरी देण्यासाठी आपली दारं खुली करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तैवानमध्ये कारखाने, शेती, बांधकाम प्रकल्प, घरगुती कामगार, मत्स्यव्यवसाय तसेच हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असून या क्षेत्रात सुमारे १ लाख कामगारांची गरज निर्माण झाली आहे. भारत आणि तैवानदरम्यान येत्या डिसेंबरपर्यंत यासंबंधात अधिकृत करारावर स्वाक्षरी होणे अपेक्षित आहे, असे ब्लूमबर्गच्या वृत्तात म्हटले आहे. तैवानमध्ये उपरोल्लिखीत कामांसाठी कामगारांना सध्या प्रती महिना किमान ८२० अमेरिकी डॉलर (६८ हजार भारतीय रुपये) एवढे वेतन दिले जाते. शिवाय तैवानमध्ये काम करणाऱ्या परदेशी कामगाराला तैवान सरकारकडून आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. तैवानमध्ये कामगारांमध्ये स्थानिक आणि परदेशी असा भेदभाव न करता त्यांना स्थानिक कामगारांप्रमाणेच वेतन देण्यात येते.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

तैवान हा चीनचा शेजारी देश आहे. या दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणावपूर्ण संबंध आहेत. चीन हा देश तैवानला आपल्या देशाचा एक भाग मानतो. तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानत आलेला आहे. चीनला शह देण्यासाठी अमेरिका तैवानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवून आहे. मात्र भारताने तैवानसोबत कामगार पुरवण्याचा करार करण्यामध्येही अनेक अडचणी असल्याचे बोलले जाते. तैवानसोबत भारताने कामगार पुरविण्याचा स्वतंत्र करार करणे म्हणजे चीनचे ‘एक चीन धोरण’ नाकारणे असा त्याचा अर्थ होत नाही, असं भारताचं म्हणण आहे. तैवान आणि भारतात दोन दशक जुने व्यापार संबंध आहेत. तैवानमधून भारतात दरवर्षी विविध प्रकारच्या मशिनरी, रसायने, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला लागणारे घटक, सोलर सेल्स तसेच पीव्हीसीची आयात केली जाते. भारताने तैवानसोबत अनौपचारिक संबंध वाढवण्यावर नेहमी भर दिलेला आहे. ​

तैवान हा एक भक्कम आर्थिक पाया असलेला देश असून वार्षिक ७९० अब्ज डॉलरची त्यांची अर्थव्यवस्था आहे. तैवानमध्ये बेरोजगारीचा दर अत्यल्प आहे. परंतु २०२५ नंतर तैवानच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग हा वृद्धात्वाकडे झुकणार आहे. त्यामुळे त्यांना देशात तरुण कामगारांची कमतरचा भासणार असल्याचे या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या कामहार भरती प्रक्रियेमागचे एक कारण मानले जाते. 

 

 

पुढील बातम्या