मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Instagram Down : इंस्टाग्रामकडून डाऊन.. फॉलोअर्स कमी झाल्याच्या युजर्संच्या तक्रारी

Instagram Down : इंस्टाग्रामकडून डाऊन.. फॉलोअर्स कमी झाल्याच्या युजर्संच्या तक्रारी

Oct 31, 2022, 09:41 PM IST

  • लॉगइन केल्यानंतर अकाउंट सस्पेंड झाल्याचे नोटिफिकेशन दिसत आहे. याचा स्क्रीनशॉट अनेक लोक शेअर करत आहेत. तर खरंच इंस्टाग्राम लोकांचे अकाउंट सस्पेंड करत आहे?

इंस्टाग्राम

लॉगइन केल्यानंतर अकाउंट सस्पेंड झाल्याचे नोटिफिकेशन दिसत आहे. याचा स्क्रीनशॉट अनेक लोक शेअर करत आहेत. तर खरंच इंस्टाग्राम लोकांचे अकाउंट सस्पेंड करत आहे?

  • लॉगइन केल्यानंतर अकाउंट सस्पेंड झाल्याचे नोटिफिकेशन दिसत आहे. याचा स्क्रीनशॉट अनेक लोक शेअर करत आहेत. तर खरंच इंस्टाग्राम लोकांचे अकाउंट सस्पेंड करत आहे?

दोन दिवसापूर्वी अनेक तास व्हॉट्सअ‍ॅप डाउन राहिल्याने लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. आता सोशल नेटवर्किंगअ‍ॅप इंस्टाग्रामवरही नेटीझन्सना अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. युजर्संनी दावा केला आहे की, लॉगइन केल्यानंतर अकाउंट सस्पेंड झाल्याचे नोटिफिकेशन दिसत आहे. याचा स्क्रीनशॉट अनेक लोक शेअर करत आहेत. तर खरंच इंस्टाग्राम लोकांचे अकाउंट सस्पेंड करत आहे?

ट्रेंडिंग न्यूज

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

Business Ideas : उद्योग क्षेत्रात ‘जो दिखता है वोही बिकता है...’ हेच सूत्र चालतं…

Akshaya Tritiya Investment : फक्त सोनेच नाही, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही गुंतवणूकही ठरते शुभ

Bank News : 'या' बँकेत तुमचं खातं असेल, पण बँक बॅलन्स नसेल तर एक महिन्यानंतर खातं थेट बंद होणार

इंस्टाग्रामच्या कम्युनिकेशन टीमने ट्वीट करून म्हटले आहे की, आम्हाला याची जाणीव आहे की, तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट ऐक्सेस करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही यावर काम करत आहोत. युजर्सना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही खेद व्यक्त करत आहोत.एका यूजरने लिहिले आहे की, इस्टाग्राम हे काय होत आहे? विनाकारण माझे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. जेव्हा मीकोडव्हेरिफाय करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एरर दाखवत आहे. आणखी कोणाला अशा समस्या येत आहेत का?

 

मिळालेल्या माहितीनुसार असे तेव्हा होते तेव्हा सर्वरवर सायबर हल्ला होतो. ट्विटरसोबतही अशा प्रकारची घटना घडली होती. नंतर समजले की, हॅकरने बॅकेंडचा ऐक्सेस केला होता. दरम्यान कोणत्याही सोशल प्लेटफॉर्मने हॅकिंगची माहिती दिली नाही.

 

रियलटाइम ऑनलाइन आउटेज ट्रॅकर डाउन डिटेक्टरनुसार मागील एक तासात जवळपास ७ हजारयूजर्संना अशा प्रकारचा सामना करावा लागत आहे. सांगितले जात आहे की, अनेक यूजर्सचे फॉलोअर्सही अचानक कमी झाले आहेत.

विभाग

पुढील बातम्या