मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Inox ipo listing : आयनॉक्सच्या आयपीओनं केला वर्षाचा शेवट गोड, गुंतवणूकदार मालमाल

Inox ipo listing : आयनॉक्सच्या आयपीओनं केला वर्षाचा शेवट गोड, गुंतवणूकदार मालमाल

Dec 21, 2023, 11:45 AM IST

  • Inox India IPO listing news : आयनॉक्स इंडियाचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दणदणीत फायदा झाला आहे.

Inox India IPO

Inox India IPO listing news : आयनॉक्स इंडियाचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दणदणीत फायदा झाला आहे.

  • Inox India IPO listing news : आयनॉक्स इंडियाचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला असून पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दणदणीत फायदा झाला आहे.

Inox India IPO Listing news : शेअर बाजारात सध्या आयपीओची धूम आहे. दर आठवड्याला नवे आयपीओ येत आहेत, तर आलेले सूचीबद्ध होत आहेत. आज यात आणखी एकाची भर पडली. क्रायोजेनिक टँक उत्पादक आयनॉक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ आज सूचीबद्ध झाला. या आयपीओनं गुंतवणूकदारांचा वर्षाचा शेवट गोड केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

शेअर बाजारात आज अस्थिरता दिसत आहे. मात्र, या अस्थिरतेतही आयनॉक्स इंडियाच्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. हा शेअर बीएसई आणि एनएसई दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध झाला आहे. बीएसईवर हा शेअर ४२ टक्क्यांच्या प्रीमियमसह ९३३.१५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर एनएसईवर कंपनीचा शेअर ४३.८९ टक्क्यांसह ९४९.६५ रुपयांवर सूचीबद्ध झाला.

Gold Silver price today : चांदी महागली! मुंबईत सोन्याचा आजचा भाव किती? पाहा!

सुमारे १७ वर्षांपूर्वी आयनॉक्स लेझरचा (मल्टिप्लेक्स शाखा) आयपीओ आला होता. त्यानंतर आयनॉक्स समूहाची हा पहिलाच आयपीओ होता. ६६० रुपये इश्यू प्राइस असलेल्या या शेअरचा भाव आज पहिल्याच दिवशी ९४९ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.

शेवटच्या दिवशी ६१.२८ पट सब्सक्राइब

आयनॉक्सचा आयपीओ १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत खुला होता. आयपीओसाठी प्रति शेअर ६२७ ते ६६० रुपयांचा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. ऑफरच्या शेवटच्या दिवशी सोमवारी हा आयपीओ ६१.२८ पट सब्सक्राइब झाला. एनएसईच्या आकडेवारीनुसार, १,५४,७७,६७० शेअर्सच्या ऑफरसाठी ९४,८४,२४,२६८ शेअर्सची बोली लागली होती. 

IPO News : मोतीसन्स ज्वेलर्सच्या आयपीओवर गुंतवणूकदारांच्या उड्या; २६ डिसेंबरला मोठा धमाका होण्याचे संकेत

आयपीओला पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत सर्वाधिक १४७.८० पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत ५०.२० पट सब्सक्रिप्शन मिळालं. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत (RII) १५.२९ पट सब्सक्रिप्शन मिळालं. हा इश्यू निव्वळ ऑफर फॉर सेल (ओएफएस) असल्याने कंपनीला कोणतंही उत्पन्न मिळणार नाही.

विभाग

पुढील बातम्या