मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mukesh Ambani Family Office : मुकेश अंबानी करणार उद्योगांचा विस्तार; ‘या’ देशात उघडणार फॅमिली ऑफिस

Mukesh Ambani Family Office : मुकेश अंबानी करणार उद्योगांचा विस्तार; ‘या’ देशात उघडणार फॅमिली ऑफिस

Oct 08, 2022, 12:39 PM IST

    • Mukesh Ambani Family Office : आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या उद्योगांचा विदेशात विस्तार करण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं आहे.
Mukesh Ambani Family Office In Singapore (PTI)

Mukesh Ambani Family Office : आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या उद्योगांचा विदेशात विस्तार करण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं आहे.

    • Mukesh Ambani Family Office : आशिया खंडातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी त्यांच्या उद्योगांचा विदेशात विस्तार करण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल उचललं आहे.

Mukesh Ambani Family Office In Singapore : आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार करण्याच्या उद्देशानं सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडण्याची करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी या ऑफिससाठी सिंगापूरमध्ये जागाही निश्चित केली असून लवकरच त्याचं काम सुरू केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचं म्हणजे अंबानींनी सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस सुरू केल्याची घोषणा केल्यानंतरच आता त्यासाठी कर्मचाऱ्यांची आणि व्यवस्थापकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स कंपनी तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल व्यवसायातून ई-कॉमर्स, ग्रीन एनर्जी आणि रिटेल व्यवसायाचा विस्तार करण्याचा तयारीत आहे. त्यासाठी कमी कर आणि उद्योगांच्या सुरक्षिततेमुळं सिंगापूर हा देश नेहमीच उद्योगपतींसाठी पहिली पसंती असते. त्यामुळं आता मुकेश अंबानी यांनी त्यांचं फॅमिली ऑफिस सिंगापूरमध्ये सुरू करण्याची घोषणा केली आहे.

अंबानी यांच्याआधी उद्योगपती रे डेलियो आणि गुगलचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडलेलं आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये सिंगापूरमध्ये कार, घर आणि अन्य वस्तूंच्या किंमतीत वाढ होत असल्यानं तेथील मार्केट काबीज करण्यासाठी रिलायन्सनं हा प्लॅन आखल्याची चर्चा आहे.

अदानी आणि अंबानी यांच्यात उद्योगस्पर्धा...

मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप हा भारतातील सर्वात मोठा खाजगी उद्योगसमूह मानला जातो. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून मुकेश अंबानी हे भारतासह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. परंतु गेल्या काही वर्षात अदानी उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाल्यामुळं ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. याशिवाय अदानी समूहानं पेट्रोलियम, माध्यम आणि टेलिकॉम क्षेत्रातही एन्ट्री केल्यानं रिलायन्स कंपनीला तोटा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळंच आता मुकेश अंबानींनी अदानींना शह देण्यासाठी सिंगापूरमध्ये फॅमिली ऑफिस उघडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

पुढील बातम्या