मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gautam Adani: जगात मंदीचे वारे वाहत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी गौतम अदानींचं मोठं विधान

Gautam Adani: जगात मंदीचे वारे वाहत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी गौतम अदानींचं मोठं विधान

Nov 19, 2022, 04:47 PM IST

  • Gautam Adani on Indian Economy: आज सरकार ज्या गतीने सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करतेय ते पाहता २०५० सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही ३० ट्रिलियन डॉलरची होऊ शकते.

Chairperson of Indian conglomerate Adani Group, Gautam Adani (AFP)

Gautam Adani on Indian Economy: आज सरकार ज्या गतीने सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करतेय ते पाहता २०५० सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही ३० ट्रिलियन डॉलरची होऊ शकते.

  • Gautam Adani on Indian Economy: आज सरकार ज्या गतीने सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करतेय ते पाहता २०५० सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही ३० ट्रिलियन डॉलरची होऊ शकते.

Gautam Adani on Indian Economy: आजची तीन ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी भारताला स्वातंत्र्यानंतर ७५ वर्ष लागली. परंतु आज सरकार ज्या गतीने सामाजिक आणि आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करतेय ते पाहता पुढील दशकात भारत हा प्रत्येक १२ ते १८ महिन्यांनी विकास दरात (जीडीपी) एक ट्रिलियन डॉलरची भर नोंदविण्यास सुरुवात करेल. २०५० सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होऊ शकते, असे मत अदाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी व्यक्त केले. भारतातील सनदी लेखापालांच्या परिषदेत ते बोलत होते. यावेळी अदाणी यांनी २०५० साली भारतीय अर्थव्यवस्था कशी असेल याचं स्वरुप विषद केलं.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

अदाणी म्हणाले, ‘आज आपण एका अनिश्चितच अशा प्रसंगी येथे एकत्र आलो आहोत. कोविडच्या साथीचा छेदनबिंदू, रशिया-युक्रेनमधील युद्ध, हवामान बदलामुळे निर्माण झालेले आव्हान, ऊर्जेच्या वाढत्या किंमती आणि वाढती महागाई यामुळे जागतिक नेतृत्वासमोर अनेक आव्हानं आहेत.’

२०५० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार किती?

अदाणी पुढे म्हणाले, ‘२०५० मध्ये भारताची लोकसंख्या १५% ने वाढून १.६ अब्ज होईल. त्यावेळी भारताचे सरासरी वयोमान ३८ वर्षे असेल. परंतु दरडोई उत्पन्न ७००% पेक्षा अधिक वाढून ते अंदाजे १६,००० डॉलर होईल. क्रयशक्ती असलेल्या मध्यमवर्गाच्या वाढीमुळे बाजारात वस्तुंच्या मागणीत अभूतपूर्व वाढ होईल. त्यामुळे खाजगी आणि सरकारी खर्चात वाढ होईल. तसेच थेट परकीय गुंतवणुकीचे सर्वोच्च स्तर पादाक्रांत होतील. चालू वर्षात भारताने १५% वाढीसह १०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक परदेशी गुंतवणुकीचा (FDI) सार्वकालिक उच्चांक नोंदवण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारच्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या लक्षणीय विस्ताराचा पाया रचला जातो. खरेतर भारतातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ २००० पासून २० पटीने वाढला आहे आणि २०५० पर्यंत तो १ ट्रिलियन डॉलरपर्यंत (१ लाख कोटी डॉलर) पोहोचेल, असं मला वाटतं. सध्याच्या जगाच्या संदर्भात, उद्योजकता आणि डिजिटलायझेशन यांचा अनोखा संबंध आहे.

 डिजिटलायझेशनने उद्योजकतेचा वेग वाढवला आहे. डिजिटल भारत हा आरोग्यसेवा, शिक्षण आणि कौशल्य विकासामध्ये परिवर्तन घडवून आणेल आणि अधिक न्याय्य असा समाज निर्माण करेल. तंत्रस्नेही सक्षम अशा भारतात या संदर्भातील होणाऱ्या व्यवहाराबाबतच्या सर्व पैलूंमध्ये बदल घडून येत आहेत. आणि एक गतिशील नाविन्यपूर्ण वातावरण निर्मितीसाठी या दोहोंचे एकत्रीकरण झाले आहे. भारताचा अर्थ वेग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने मोठ्या प्रमाणात - नवीन आणि नाविन्यपूर्ण बाजारपेठ निर्माण होईल. पुढील तीन दशके हे भारताला उद्योजकतेच्या आघाडीवर नेतील, असा माझा विश्वास आहे, असं अदाणी म्हणाले.

यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. देबाशिष मित्रा, आयसीएआयचे उपाध्यक्ष सुनील तलाठी, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ अकाउंटंट्सचे मावळते अध्यक्ष एलन जॉन्सन, IFAC च्या नवनियुक्त अध्यक्षा अस्मा रेसमौकी इत्यादी उपस्थित होते.

पुढील बातम्या