मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Hyundai Venue Price hike : ह्युंदाईने ग्राहकांना दिला धक्का, वेन्यूच्या किमतीत वाढ

Hyundai Venue Price hike : ह्युंदाईने ग्राहकांना दिला धक्का, वेन्यूच्या किमतीत वाढ

Aug 21, 2023, 09:54 PM IST

    • Hyundai Venue Price hike : ह्युंदाई मोटर इंडिआने २०२३ वेन्यू एसयूव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने बेस व्हेरियंट्समध्ये ५ हजारांपर्यंत वाढ केली आहे.
hyundai venue HT

Hyundai Venue Price hike : ह्युंदाई मोटर इंडिआने २०२३ वेन्यू एसयूव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने बेस व्हेरियंट्समध्ये ५ हजारांपर्यंत वाढ केली आहे.

    • Hyundai Venue Price hike : ह्युंदाई मोटर इंडिआने २०२३ वेन्यू एसयूव्हीच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने बेस व्हेरियंट्समध्ये ५ हजारांपर्यंत वाढ केली आहे.

Hyundai Venue Price hike : ह्युंदाई मोटर इंडियाने आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा किंमत वाढीचा झटका दिला आहे. कंपनीने २०२३ वेन्यूला देशांतर्गत बाजारात ७.६८ लाख (एक्स शोरूम किंमत) रुपयांमध्ये दाखल केले होते. या बदलानंतर ह्युंदाई वेन्यूच्या बेस ई व्हेरियंट्सच्या किंमतींमध्मये ५३०० रुपयांची वाढ झाली आहे. तर इतर व्हेरियंट्सवर कोणताही प्रभाव पडणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

व्हेरियंट्स आणि कलर आॅप्शन्स

५ व्यक्तींची आसन क्षमता असलेल्या काॅम्पॅक्ट एसयूव्ही ६ विविध ट्रिम्प्समध्ये उपलब्ध आहे. मार्केटमध्ये ते ई, एस, एस प्लस, एस(ओ), एसएक्स आणि एसएक्स (ओ) च्या रुपात उपलब्ध आहेत. खरेदीदार वेन्यूला ६ सिंगल टोन कलर आॅप्शन अथवा ड्यूएल टोनपैकी कोणत्याही एका टोनमध्ये निवडू शकतात. सिंगल टोन पॅलेटमध्ये फायरी रेड, फॅटम ब्लॅक, डेनिम ब्लू, टायफून सिल्व्हर, टायटन ग्रे, पोलर व्हाईटमध्ये खरेदी करू शकतात.

इंजिन पावरट्रेन

ह्युंदाई वेन्यू तीन वेगवेगळ्या इंजिन पावरट्रेन आॅप्शनमध्ये उपलब्ध आहेत. यात १.२ लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. त्यानंतर १.० लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि शेवटी १.५ लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

वेन्यूचे नाईट व्हेरियंट्स

ह्युंदाईने नुकतेच वेन्यूचे नाईट व्हेरियंट दाखल केले होते. त्याची किंमत ९,९९,९९० रुपये (एक्स शोरूम) पासून सुरू होते. या व्हेरियंटमध्ये इंजिनचे दोन पर्याय मिळतात.

विभाग

पुढील बातम्या