मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Banks Guidelines for 2000 note exchange : एचडीएफसीसह ५ बँकांनी २००० नोटा बदलण्याची गाईडलाईन्स केली जाहीर

Banks Guidelines for 2000 note exchange : एचडीएफसीसह ५ बँकांनी २००० नोटा बदलण्याची गाईडलाईन्स केली जाहीर

May 24, 2023, 09:22 AM IST

    • Banks Guidelines for 2000 note exchange : २००० रुपयांची नोट जवळ असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँक शाखेत नोट बदलू शकतात. एचडीएफसी, एसबीआय, पीएनबीसहित ५ बँकांनी यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केली आहेत.
2000 notes HT

Banks Guidelines for 2000 note exchange : २००० रुपयांची नोट जवळ असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँक शाखेत नोट बदलू शकतात. एचडीएफसी, एसबीआय, पीएनबीसहित ५ बँकांनी यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केली आहेत.

    • Banks Guidelines for 2000 note exchange : २००० रुपयांची नोट जवळ असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँक शाखेत नोट बदलू शकतात. एचडीएफसी, एसबीआय, पीएनबीसहित ५ बँकांनी यासाठी मार्गदर्शक सुचना जाहीर केली आहेत.

Banks Guidelines for 2000 note exchange : आरबीआयच्या म्हणण्यानुसार, २३ मे २०२३ पासून, कोणीही २००० रुपयांची नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत इतर मूल्यांसह बदलू शकतात. तर तो त्याच्या बँकेतही जमा करू शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की ३० सप्टेंबर २०२३ नंतरही २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर मानल्या जातील. एचडीएफसी, एसबीआय, पीएनबी, साउथ इंडियन बँक आणि कोटक महिंद्रा बँकेने नोट बदलण्याबाबत मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

EPFO news : भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढणे आता आणखी सोपे! फक्त ३ दिवसांत तुमच्या हातात येणार

DHFL Scam : ३४ हजार कोटींचा बँक घोटाळा; CBI कडून DHFL चे माजी संचालक धीरज वाधवानला अटक

highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

२२ मे २०२३ रोजी जारी केलेल्या आरबीआयच्या परिपत्रकानुसार, बँकांच्या काउंटरवर २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा विनासायास पद्धतीने जनतेला दिली जाईल. उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन आरबीआयने बँकेच्या शाखांमध्ये प्रतीक्षालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा इत्यादी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे.

एसबीआय

सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, ग्राहकांना २००० रुपयांच्या १० नोटा बदलण्याची परवानगी देत ​​​​आहेत. यासाठी ग्राहकांकडून कोणतीही स्लिप किंवा फॉर्म मागितला जाणार नाही. इतर मूल्यांच्या नोटा कोणत्याही डिमांड स्लिपशिवाय दिल्या जातील.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेने एक अधिकृत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. नोटा बदलण्यासाठी कोणतेही आधार कार्ड, अधिकृत कागदपत्रे किंवा कोणताही फॉर्म भरण्याची गरज नाही, अशा सूचना सध्या पंजाब नॅशनल बँकेच्या सर्व शाखांना देण्यात आल्या आहेत.

साऊथ इंडियन बँक

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, खाजगी क्षेत्रातील साउथ इंडियन बँकेचे ग्राहक नसलेलेही मंगळवारपासून सर्व शाखांमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतात. परंतु, त्यासाठी ग्राहकांना अधिकृतपणे वैध दस्तऐवज (OVD) सादर करावे लागतील. त्याचप्रमाणे केवायसी नसलेल्या ग्राहकांसाठीही हाच नियम लागू असेल. साउथ इंडियन बँकेचे मुख्यालय केरळमध्ये आहे आणि तिच्या देशभरात 940 शाखा आहेत.

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेने सांगितले की, आम्ही कोणत्याही एचडीएफसी बँकेच्या शाखेत २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत कोणतीही अडचण मुक्त नोट एक्सचेंज सेवा देत आहोत. तुम्ही तुमच्या २००० रुपयांच्या नोटा २० हजार मूल्याच्या मर्यादेसह बदलू शकता. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना याबाबत ईमेलही जारी केला आहे.

कोटक महिंद्रा बँक

अहवालानुसार कोटक महिंद्रा बँकेने म्हटले आहे की ते २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी केवायसी मागत आहेत.

विभाग

पुढील बातम्या