मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO : ब्युटी क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ येणार, सेबीकडे अर्ज सादर

IPO : ब्युटी क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ येणार, सेबीकडे अर्ज सादर

Jan 03, 2023, 07:21 PM IST

    • IPO : ममाअर्थ या ब्युटी अँड पर्सनल केअर क्षेत्रातील ब्रॅडची पालक कंपनी होनासा कन्ज्युमर कंपनीने आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. या आॅफरमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नव्याने जारी केलेले इक्विटी शेअर्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.
IPO_HT

IPO : ममाअर्थ या ब्युटी अँड पर्सनल केअर क्षेत्रातील ब्रॅडची पालक कंपनी होनासा कन्ज्युमर कंपनीने आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. या आॅफरमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नव्याने जारी केलेले इक्विटी शेअर्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.

    • IPO : ममाअर्थ या ब्युटी अँड पर्सनल केअर क्षेत्रातील ब्रॅडची पालक कंपनी होनासा कन्ज्युमर कंपनीने आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. या आॅफरमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नव्याने जारी केलेले इक्विटी शेअर्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.

IPO : ममाअर्थ या ब्युटी अँड पर्सनल केअर क्षेत्रातील ब्रॅडची पालक कंपनी होनासा कन्ज्युमर कंपनीने आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे. या आॅफरमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नव्याने जारी केलेले इक्विटी शेअर्स उभारण्याची कंपनीची योजना आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

ममाअर्थ या ब्युटी अँड पर्सनल केअर क्षेत्रातील ब्रॅडची पालक कंपनी होनासा कन्ज्युमर कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल केला आहे. या आॅफरमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंत नव्याने जारी केलेले इक्विटी शेअर्स उभारण्याची कंपनीची योजना आहे. समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करणाऱ्या समभागधारकांकडून ४,६८,१९,६३५ पर्यंत इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरचा समावेश आहे.

या कारणासाठी भांडवल उभारणी

नव्याने जारी करण्यात येणार असलेल्या समभागांच्या विक्रीतून उभारली जाणारी रक्कम ब्रँड्सविषयी जागरूकता वाढावी आणि ब्रँड जास्तीत जास्त लोकांच्या नजरेस पडावा यासाठी जाहिरातींवर खर्च १८६ कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. याशिवाय नवीन ईबीओ उभारण्यासाठी भांडवली खर्च ३४.२३ कोटी रुपये आणि नवीन सलोन्स उभारणीसाठी भाबानी ब्लन्ट हेअरड्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीमध्ये गुंतवणूक २७.५२ कोटी रुपये आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे व अज्ञात इनऑरगॅनिक अधिग्रहणाचा कंपनीचा प्रस्ताव आहे.

रेड हेररिंग प्रॉस्पेक्टसमार्फत विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात येणार असलेले इक्विटी समभाग हे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

विक्रीसाठीच्या प्रस्तावामध्ये यांचा समावेश

विक्रीसाठीच्या प्रस्तावामध्ये यांचा समावेश आहे - वरुण अलघ यांच्याकडून ३१,८६,३०० पर्यंत इक्विटी समभाग आणि गज़ल अलघ यांच्याकडून १,००,००० पर्यंत इक्विटी समभाग (समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत असलेले प्रमोटर); सेल ईमार्फत गुंतवणूक करण्यात आलेले २,२०,६१३ पर्यंत इक्विटी समभाग इवोल्वन्स इंडिया कॉइनवेस्ट पीसीसी यांच्याकडून, इव्हॉल्व्हन्स इंडिया फंड III लिमिटेड यांच्याकडून ८,६२,९८७ पर्यंत इक्विटी शेअर्स, फायरसाईड व्हेंचर्स इन्व्हेस्टमेंट फंड - I कडून ७९,७२,४७८ पर्यंत इक्विटी शेअर्स, सोफिना व्हेंचर्स एस ए कडून १,९१,३३,९४८ पर्यंत इक्विटी शेअर्स आणि स्टिलरीस व्हेंचर पार्टनर्स इंडियाकडून १,२७,५५,९६५ पर्यंत इक्विटी शेअर्स; कुणाल बहल यांच्याकडून ७,७७,६७२ पर्यंत इक्विटी शेअर्स, रिषभ हर्ष मारीवाला यांच्याकडून ४,७७,३०० पर्यंत इक्विटी शेअर्स, रोहित कुमार बन्सल यांच्याकडून ७,७७,६७२ पर्यंत इक्विटी शेअर्स आणि इतर विक्री करणाऱ्या समभागधारकांचे इक्विटी समभागांचा समावेश आहे.

लीड मॅनेजर्सची नावे

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड आणि जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.

विभाग

पुढील बातम्या