मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Higher EPS Pension : ईपीएफओने हायर पेन्शनर्सना दिला दिलासा, पेन्शन गणना पद्धत जारी

Higher EPS Pension : ईपीएफओने हायर पेन्शनर्सना दिला दिलासा, पेन्शन गणना पद्धत जारी

Jun 15, 2023, 04:06 PM IST

    • Higher EPS Pension : ईपीएफओने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ईपीएस अंतर्गत वास्तविक पगाराच्या आधारावर, उच्च पेन्शनची निवड करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पेन्शनची गणना केली जाईल.
EPS HT

Higher EPS Pension : ईपीएफओने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ईपीएस अंतर्गत वास्तविक पगाराच्या आधारावर, उच्च पेन्शनची निवड करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पेन्शनची गणना केली जाईल.

    • Higher EPS Pension : ईपीएफओने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ईपीएस अंतर्गत वास्तविक पगाराच्या आधारावर, उच्च पेन्शनची निवड करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पेन्शनची गणना केली जाईल.

Higher EPS Pension : ईपीएस सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जून २०२३ आहे. परंतु, जास्त पेन्शनच्या हिशोबासंदर्भात ईपीएस सदस्य संभ्रमात होते. मात्र आता ईपीएफओ​​ने उच्च पेन्शन गणना पद्धतीबाबत परिस्थिती साफ केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

ईपीएफओने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार ईपीएस अंतर्गत वास्तविक पगाराच्या आधारावर उच्च पेन्शनची निवड करणार्‍या कर्मचार्‍यांना उच्च पेन्शनची गणना केली जाईल. १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त होणार्‍यांसाठी आणि या तारखेनंतर निवृत्त होणार्‍यांसाठी उच्च निवृत्ती वेतन मोजणीचे सूत्र वेगळे असेल.

१ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांसाठी पेन्शन गणना

ईपीएफओच्या मते, जर पात्र अर्जदाराची पेन्शन (EPS) १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सुरू झाली असेल, तर जास्त पेन्शनची गणना सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वीच्या १२ महिन्यांच्या योगदान कालावधीत काढलेल्या सरासरी मासिक पगारावर आधारित असेल.

१ सप्टेंबर २०१४ रोजी किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्यांसाठी पेन्शन गणना

१ सप्टेंबर २०१४ रोजी किंवा त्यानंतर निवृत्त होणाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वीच्या ६० महिन्यांच्या कालावधीत सेवा योगदान कालावधी दरम्यान काढलेल्या सरासरी पगाराचा विचार करून उच्च ईपीएस पेन्शनची गणना केली जाईल.

१ सप्टेंबर २०१४ दिवसच बेस का मानला जातो?

सरकारने सप्टेंबर २०१४ मध्ये पेन्शन गणना सूत्र सुधारित केले होते. ३१ ऑगस्ट २०१४ पर्यंत सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वीच्या १२ महिन्यांतील सरासरी पगार विचारात घेण्यात आला. मात्र, १ सप्टेंबर २०१४ पासून सरकारने त्यात सुधारणा करून ६० महिने केले. या बदलामुळे या तारखेला किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्यांचे पेन्शन कमी झाले.

सरासरी पगार हा कर्मचाऱ्याचा मूळ पगार असतो. तथापि, उच्च ईपीएस पेन्शनची निवड करणार्‍यांसाठी, उच्च पेन्शनच्या गणनेसाठी वापरलेले वेतन हे मूळ वेतनाऐवजी संपूर्ण वास्तविक वेतन, भत्ते यांचा समावेश असणार आहे.

विभाग

पुढील बातम्या