मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Happy Forgings IPO Listing : हॅप्पी फोर्जिंगच्या शेअरची हॅप्पी ओपनिंग, पहिल्याच दिवशी भाव हजार पार, पण गुंतवणूकदार पेचात

Happy Forgings IPO Listing : हॅप्पी फोर्जिंगच्या शेअरची हॅप्पी ओपनिंग, पहिल्याच दिवशी भाव हजार पार, पण गुंतवणूकदार पेचात

Dec 27, 2023, 01:34 PM IST

  • Happy Forgings IPO Listing News : हॅप्पी फोर्जिंग्जच्या शेअरनं अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात जोरदार एन्ट्री करत गुंतवणूकदारांना खूष केलं आहे.

Happy Forgings IPO Listing

Happy Forgings IPO Listing News : हॅप्पी फोर्जिंग्जच्या शेअरनं अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात जोरदार एन्ट्री करत गुंतवणूकदारांना खूष केलं आहे.

  • Happy Forgings IPO Listing News : हॅप्पी फोर्जिंग्जच्या शेअरनं अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात जोरदार एन्ट्री करत गुंतवणूकदारांना खूष केलं आहे.

Share Market Updates News : हॅप्पी फोर्जिंग कंपनीचा आयपीओ आज शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. अपेक्षेप्रमाणे हा शेअर १८ टक्क्यांनी वधारून सूचीबद्ध झाला आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना चांगला फायदा झाला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

हॅप्पी फोर्जिंग्जचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) १००१.२५ रुपयांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) १००० रुपयांवर सूचीबद्ध झाला. लिस्टिंगनंतर लगेचच गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावल्यानं शेअर घसरला आणि एनएसईवर त्यानं ९६१ रुपयांची पातळी गाठली. इंट्राडेमध्ये या शेअरला पसंती मिळाल्यानं पुन्हा भाव वधारला आणि  एनएसईवर १,०४४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. सध्या एनएसईवर हा शेअर १,०२५ रुपयांवर ट्रेड करत आहे.

SBI FD Rates : स्टेट बँकेकडून ग्राहकांना नव्या वर्षाची खास भेट, एफडीच्या व्याजदरात वाढ

मार्केट एक्सपर्ट्सची निराशा

हॅप्पी फोर्जिंग्जची आयपीओ लिस्टिंग अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचं मार्केट एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे. उच्च मूल्यांकन हे त्याचं कारण असू शकतं, असं तज्ज्ञांना वाटतं. हॅप्पी फोर्जिगच्या शेअरची मूळ किंमत ८५० रुपये होती. हा शेअर प्रीमियमवर लिस्ट झाला असला तरी म्हणावा तितका नफा दिलेला नाही. त्यामुळं गुंतवणूकदार पेचात पडले आहेत. अशा गुंतवणूकदारांना मार्केट एक्सपर्ट्सनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

मार्केट एक्सपर्ट म्हणतात…

'मागच्या तीन वर्षांतील कंपनीची सातत्यपूर्ण कामगिरी आणि वाढीमुळे आयपीओ लिस्टिंग चांगली झाली आहे. ही कंपनी देशांतर्गत क्रॅन्कशाफ्ट उत्पादन उद्योगातील अग्रगण्य कंपनी आहे. जागतिक फोर्जिंग आणि भारतीय क्रॅन्कशाफ्ट बाजार अनुक्रमे ५.२ टक्के आणि ८.३ सीएजीआर दरानं वाढण्याची अपेक्षा असल्यानं भविष्यात कंपनीच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आहे, असं स्टॉक्सबॉक्सचे रिसर्च अ‍ॅनालिस्ट पार्थ शाह यांनी सांगितलं.

Flipkart Winter Sale: सॅमसंगचा ७० हजारांचा फोन अवघ्या ३० हजारात खरेदी करण्याची संधी!

केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संस्थापक अरुण केजरीवाल यांच्या मते, ‘शेअरची किंमत जास्त असल्यामुळं सकारात्मक लिस्टिंग होऊनही विक्रीचा दबाव येत आहे. त्यामुळं आयपीओ लागलेल्यांनी स्टॉप लॉस ९६१ रुपयांपर्यंत ठेवून जास्तीत जास्त नफा मिळेल का याचा विचार करावा, असं केजरीवाल म्हणाले. अन्य गुंतवणूकदारांनी शेअरची किंमत स्थिर होईपर्यंत वाट पाहावी. त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा.’

 

(डिस्क्लेमर: वर केलेली मते आणि शिफारशी  विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांची व्यक्तिगत मतं आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी मान्यताप्राप्त तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या