मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ratan Tata birthday : वयाच्या ८६ व्या वर्षीही नाविन्याची ओढ; 'या' स्टार्टअप्समध्ये आहे रतन टाटांची गुंतवणूक

Ratan Tata birthday : वयाच्या ८६ व्या वर्षीही नाविन्याची ओढ; 'या' स्टार्टअप्समध्ये आहे रतन टाटांची गुंतवणूक

Dec 28, 2023, 01:53 PM IST

  • Ratan Tata Investment in Startups : प्रख्यात उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे आज ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही नाविन्यपूर्ण कल्पनांना आर्थिक प्रोत्साहन देताना दिसतात.

Ratan Tata Birthday

Ratan Tata Investment in Startups : प्रख्यात उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे आज ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही नाविन्यपूर्ण कल्पनांना आर्थिक प्रोत्साहन देताना दिसतात.

  • Ratan Tata Investment in Startups : प्रख्यात उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे आज ८६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या वयातही नाविन्यपूर्ण कल्पनांना आर्थिक प्रोत्साहन देताना दिसतात.

Ratan Tata Birthday News : देशातील प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांचा आज ८६ वा वाढदिवस आहे. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष असलेल्या जगातील दानशूर अब्जाधीशांमध्ये केली जाते. रतन टाटा हे त्यांच्या व्यवसायासोबतच अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. वयाच्या ८६व्या वर्षीही त्यांना नाविन्याची ओढ आहे. तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना ते आर्थिक मदत देत असतात. अशा प्रकारे आर्थिक आधार देऊन त्यांनी अनेक स्टार्टअप्सना नवी दिशा दिली आहे. रतन टाटा यांनी स्टार्टअप्समध्ये केलेल्या गुंतवणुकीबद्दल जाणून घेऊया…

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

ओला/ओला इलेक्ट्रिक

रतन टाटा यांची ओला/ओला इलेक्ट्रिकमध्ये गुंतवणूक आहे. २०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा या कंपनीत गुंतवणूक केली. त्यावेळी ही कंपनी स्थापन होऊन ५ वर्षे झाली होती. २०१९ मध्ये त्यांनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला निधी दिला. ही कंपनी सध्या चांगली कामगिरी करत असून कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येत आहे. 

पेटीएम

फिनटेक फर्म पेटीएममध्ये देखील रतन टाटांची गुंतवणूक आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्समध्ये त्यांनी २०१५ साली ही गुंतवणूक केली होती. आज पेटीएम ही देशातील आघाडीची फिनटेक फर्म आहे. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टही झाली आहे.

Ratan Tata Birthday : ८६ वर्षांचे झाले रतन टाटा! त्यांचे 'हे' अनुभवाचे बोल देतील जीवनाला दिशा

स्नॅपडील

रतन टाटा यांनी ऑगस्ट २०१४ मध्ये स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करून ई-कॉमर्स उद्योगात प्रवेश केला. त्यांनी स्नॅपडीलमधील ०.१७ टक्के भागभांडवल ५ कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक करून विकत घेतले होते. २०१० मध्ये कुणाल बहल आणि रोहित बन्सल यांनी सुरू केलेलं स्नॅपडील हे एकेकाळी लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म होतं.

गुडफेलो

रतन टाटा यांनी 'गुडफेलो' नावाच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. गुडफेलोजची स्थापना शंतनू नायडू यांनी केली होती. या नायडू यांनी कधीकाळी रतन टाटा यांच्यासाठी काम केलं होतं. तरुण आणि शिक्षित पदवीधरांशी जोडून घेऊन वृद्धांच्या एकाकीपणावर मात करणं हा गुडफेलोचा उद्देश आहे.

झिवामे

महिलांच्या अंतर्वस्त्रांचा लोकप्रिय ब्रँड Zivame मध्ये देखील रतन टाटांची गुंतवणूक आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये झिवामेमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली.

लेन्सकार्ट

पीयूष बन्सल आणि अमित यांनी २०१० मध्ये आयवेअर प्लॅटफॉर्म लेन्सकार्टची स्थापना केली होती. या स्टार्टअपला एप्रिल २०१६ मध्ये रतन टाटा यांनी निधी दिला.

IPO Listing News : आझाद इंजिनीअरिंगच्या शेअरची दणक्यात एन्ट्री; सचिनला किती कोटींचा फायदा झाला पाहा!

युवर स्टोरी

रतन टाटा यांनी डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म Your Story मध्ये देखील गुंतवणूक केली आहे. मात्र, गुंतवणुकीचा आकडा समोर आलेला नाही.

कारदेखो

Cardekho हा देशातील अग्रगण्य ऑनलाइन ऑटो सर्च प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी गिरनार सॉफ्टमध्ये रतन टाटा यांची गुंतवणूक आहे. हे प्लॅटफॉर्म कार खरेदीदारांसाठी खूप उपयुक्त आहे.

क्युअर फिट

हा आरोग्य क्षेत्रासाठी फिटनेस प्लॅटफॉर्म आहे. कलारी कॅपिटल, एक्सेल पार्टनर्स, चिराता व्हेंचर्स व्यतिरिक्त रतन टाटा यांनीही यात गुंतवणूक आहे.

विभाग

पुढील बातम्या