मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Haji Yatra : हज यात्रेवर जा टेन्शन फ्री!; मक्का मदिनाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी SBI ची अनोखी योजना

Haji Yatra : हज यात्रेवर जा टेन्शन फ्री!; मक्का मदिनाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी SBI ची अनोखी योजना

Apr 07, 2023, 10:09 AM IST

  • SBI Cashless scheme for Hajj Yatra : हज यात्रा २०२३ मध्ये हे पहिल्यांदाच घडेल जेव्हा महिलांचा सर्वात मोठा गट हजला जाणार आहे.

Haji Yatra 2023 HT

SBI Cashless scheme for Hajj Yatra : हज यात्रा २०२३ मध्ये हे पहिल्यांदाच घडेल जेव्हा महिलांचा सर्वात मोठा गट हजला जाणार आहे.

  • SBI Cashless scheme for Hajj Yatra : हज यात्रा २०२३ मध्ये हे पहिल्यांदाच घडेल जेव्हा महिलांचा सर्वात मोठा गट हजला जाणार आहे.

Haji Yatra 2023 : यावर्षी हज २०२३ ला जाणाऱ्यांची संख्या १.८४ लाख आहे. यावेळी पहिल्यांदाच महिलांचा सर्वात मोठा गट पुरुषांशिवाय हजला जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रवाशांसाठी अनोखी योजना आणली आहे. हजला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी कॅशलेस व्यवस्था सुरु केली आहे. त्याअंतर्गत बँकेने हज यात्रेकरूंसाठी परदेशी मनी कार्ड जारी केले आहे. जेणेकरून हज यात्रेकरू मक्का-मदिनामध्ये कॅशलेस खरेदी करता येईल. त्याशिवाय यात्रेकरूंच्या मदतीसाठी एसबीआयने हेल्पलाइनही जारी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

Business Ideas : ‘असतील शिते तर जमतील भुते...’ पैशाची किमया अन् मित्रांचे कोंडाळे!

पुरुष सहप्रवाशाविना जाणारा सर्वात मोठा महिलांचा गट

हजसाठीचे अर्ज आणि यात्रेकरूंची निवड ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आहे. एकूण १.८४ लाख अर्जांपैकी १४,९३५ महिला हज यात्रेकरू ७० पेक्षा अधिक वयोगटातील आहेत, त्यापैकी मोठ्या संख्येने महिला यात्रेकरूंचा समावेश असून त्या एकट्या प्रवास करणार आहेत. त्यांच्यासोबत पुरुष यात्रेकरुंचा समावेश नाही. या महिलांची संख्या ४हजार पेक्षा जास्त आहे. एकट्या हजला जाणाऱ्या महिलांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा गट असल्याचे सांगितले जात आहे.

एसबीआयची हज यात्रेकरूंसाठी कॅशलेस सुविधा

निवडलेल्या सर्व १.४ लाख यात्रेकरूंना हज २०२३ साठी त्यांच्या निवडीबद्दल एसएमएस पाठवण्यात आला आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने यात्रेकरूंना परकीय चलन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत भागीदारी केली आहे.

याआधी यात्रेकरूंना भारतीय हज समितीकडे २१०० रियाल जमा करावे लागत होते. जे त्यांना मक्का आणि मदिना येथे खर्च करण्यासाठी मिळत होते. पण आता एसबीआयने हज यात्रेकरूंना कॅशलेस सुविधा देण्यासाठी फॉरेन मनी कार्ड जारी केले आहे.

हज दरम्यान विदेशी मनी कार्ड हरवल्यास पैसे परत

सर्व यात्रेकरूंना फॉरेन करन्सी फॉरेक्स कार्ड दिले जात आहेत, ज्यामुळे रोख चलन चोरी किंवा हरवण्याची शक्यता धूसर झाली आहे. प्रवासादरम्यान हे कार्ड हरवले तरी यात्रेकरूंना त्यांचे पैसे बँकेतून परत मिळू शकतील. फॉरेन मनी कार्डच्या वापरासाठी एसबीआयने हेल्पलाइन सुरु केली आहे.

विभाग

पुढील बातम्या