मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Green Hydrogen fuel : कारपासून कारखान्यापर्यंत होणार हरित हायड्रोजन इंधनाचा वापर; काय आहे ही योजना?

Green Hydrogen fuel : कारपासून कारखान्यापर्यंत होणार हरित हायड्रोजन इंधनाचा वापर; काय आहे ही योजना?

Jan 05, 2023, 02:15 PM IST

    • Green Hydrogen fuel : केंद्र सरकाने हरित हायड्रोजन मिशनवर शिक्कामोर्तब करण्यासोबतच सरकार देशातील स्वच्छ उर्जा संदर्भात मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहेत. या योजनेमुळे देशभरातील कारखान्यांपासून ते कार्सपर्यंत मोठ्या प्रमाणात बदल होण्याची अपेक्षा आहे.
green_Hydrogen_Fuel_HT

Green Hydrogen fuel : केंद्र सरकाने हरित हायड्रोजन मिशनवर शिक्कामोर्तब करण्यासोबतच सरकार देशातील स्वच्छ उर्जा संदर्भात मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहेत. या योजनेमुळे देशभरातील कारखान्यांपासून ते कार्सपर्यंत मोठ्या प्रमाणात बदल होण्याची अपेक्षा आहे.

    • Green Hydrogen fuel : केंद्र सरकाने हरित हायड्रोजन मिशनवर शिक्कामोर्तब करण्यासोबतच सरकार देशातील स्वच्छ उर्जा संदर्भात मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहेत. या योजनेमुळे देशभरातील कारखान्यांपासून ते कार्सपर्यंत मोठ्या प्रमाणात बदल होण्याची अपेक्षा आहे.

Green Hydrogen fuel : केंद्र सरकाने हरित हायड्रोजन मिशनवर शिक्कामोर्तब करण्यासोबतच सरकार देशातील स्वच्छ उर्जा संदर्भात मोठी योजना आणण्याच्या तयारीत आहेत. या योजनेमुळे देशभरातील कारखान्यांपासून ते कार्सपर्यंत मोठ्या प्रमाणात बदल होण्याची अपेक्षा आहे. अक्षय ऊर्जेशिवाय जीवाश्मापासूनही ती निर्माण करता येते.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

जीवाश्म इंधनाच्या माध्यमातून उत्पन्न झालेल्या इंधनाला ग्रे हायड्रोजन म्हणतात. आज उत्पादित हायड्रोजनमध्ये याचा मोठा हिस्सा आहे. तर अक्षय उर्जा स्त्रोतांपासून बनवण्यात येणाऱ्या उर्जेला हरित हायड्रोजन म्हटले जाते. काऊन्सिल आॅन एनर्जी, एनवायरमेंट अँड वाॅटर सेंटर्स फाॅर एनर्जी फायनान्सच्या अहवालानुसार, रिफायनरी, खाद्य, सिमेंट, स्टील, केमिकल्ससारख्या उत्पादन क्षेत्रातून ३० टक्के ग्रीन हाऊस गॅसची निर्मिती होती. या उत्पादित क्षेत्रात हरित हायड्रोनचा वापर झाल्याने पर्यावरणाची हानी पोहचवणाऱ्या गॅसचे उत्सर्जन कमी होईल.

भारतात २३ आॅगस्ट २०२२ या दिवशी स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल बच दाखल करण्यात आली. याशिवाय टोयोटा कंपनीनेही अशा प्रकारची गाडी बनवली आहे.

भारतात हायड्रोजनवर चालणारी ट्रेन बनवण्याची तयारी सुरु झाली आहे. आतापर्यंत केवळ जर्मनीमध्येच अशाप्रकारची ट्रेन कार्यन्वित आहे. आयओसी आणि दिल्ली सरकारद्वारे दिल्लीत ५० हायड्रोजन समृद्ध सीएनजी बसेसचे परिक्षण करण्यात आले होते.

तर दुसरीकडे भारत वगळता जागतिक पातळीवर १९३७ मध्ये जर्मन पॅसेंजर एअरशिप एलजेड १२९ हिडनबर्गमध्ये अटलांटिक महासागर पार करण्यासाठी हायड्रोजनचा वापर करण्यात आला. अंदाजे ६० च्या दशकात नासाने हायड्रोजन इंधनच्या मदतीने चांद्रयानाचे अपोलो मिशन यशस्वी केले.

भारत आपल्या उर्जेच्या गरजेतील अंदाजे ८६ टक्के तेल, ५४ टक्के गॅस आणि ८५ टक्के सौर उर्जा आणि मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करतो. यामुळे भारतातील परकीय चलनावर ताण येतो. हा ताण हायड्रोजनच्या वापरामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. वास्तविक हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याच्या वापरातील छोटीशी चूकीमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वैज्ञानिकांनी संपूर्णपणे सुरक्षिततेवर भर दिला आहे. तर दुसरीकडे, हायड्रोजनच्या स्टोअरेज क्षमता विकसित करणे हे देखील आव्हान आहे.

विभाग

पुढील बातम्या