मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Rate Today : सोनं आजही महागलं, चांदीच्या भावात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold Silver Rate Today : सोनं आजही महागलं, चांदीच्या भावात घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Dec 27, 2023, 02:16 PM IST

  • Gold Silver rate today 27 December 2023 : मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजी नगरमध्ये सोने व चांदीचे आजचे दर काय आहेत. पाहूया…

Gold Silver Rate Today

Gold Silver rate today 27 December 2023 : मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजी नगरमध्ये सोने व चांदीचे आजचे दर काय आहेत. पाहूया…

  • Gold Silver rate today 27 December 2023 : मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजी नगरमध्ये सोने व चांदीचे आजचे दर काय आहेत. पाहूया…

Gold Silver Rate Today in Mumbai : लगीनसराई असल्यानं सोने व चांदीच्या भावाकडं सर्वसामान्यांचं लक्ष आहे. सोन्याच्या भावात आज पुन्हा किंचित वाढ झाली आहे. तर, चांदीचा भाव २०० रुपयांनी घसरला आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम म्हणजेच तोळ्यामागे ६३,८२० रुपये आहे. कालच्या तुलनेत हा भाव ११० रुपयांनी जास्त आहे. यात जीएसटी व अन्य खर्चाचा समावेश नाही. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या सर्व शहरांतील सोन्याचा भाव आज एकसमान आहे. तर, चांदीचा भाव कालच्या तुलनेत किलोमागे ३०० रुपयांनी घसरून ७९,२०० रुपयांवर आला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर या शहरांतही किलोमागे चांदीचा भाव ७९,२०० रुपये इतकाच आहे. यात जीएसटी व अन्य खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही. मागच्या दहा दिवसांत चांदीच्या भावात १८०० रुपयांची वाढ झाली आहे.

Happy Forgings IPO Listing : हॅप्पी फोर्जिंगच्या शेअरची हॅप्पी ओपनिंग, पहिल्याच दिवशी भाव हजार पार, पण गुंतवणूकदार पेचात

महाराष्ट्रात सोन्याचा आजचा दर

२४ कॅरेट - ६३,८२० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

२२ कॅरेट - ५८,५०० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

१८ कॅरेट - ४७,८६० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

सोने-चांदीच्या दरात चढउतार का होतात?

भारतात सर्वसाधारणपणे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोने व चांदीचे भाव निश्चित करते. त्यासाठी काही घटकांचा आधार घेतला जातो. सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांना अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील घटकही कारणीभूत असतात. मोठ्या शहरांमध्ये त्या-त्या शहरांतील मोठे व्यापारी भाव निश्चित करतात.

SBI FD Rates : स्टेट बँकेकडून ग्राहकांना नव्या वर्षाची खास भेट, एफडीच्या व्याजदरात वाढ

जगभरात असलेली सोन्याची मागणी, देशा-देशांच्या चलनमूल्यातील फरक, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंदर्भातील सरकारी नियम या सर्व बाबी भावांमधील चढउतारास कारणीभूत ठरतात. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद याचाही सोने व चांदीच्या किंमतीवर परिणाम होत असतो.

विभाग

पुढील बातम्या