मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Rate Today : सोने महागले, चांदी उतरली! पाहा तुमच्या शहरातील भाव

Gold Silver Rate Today : सोने महागले, चांदी उतरली! पाहा तुमच्या शहरातील भाव

Dec 23, 2023, 10:36 AM IST

  • Gold Silver Rate today 23 December 2023 : आज सोने व चांदीच्या दरात किंचित बदल झाला आहे. सोने महागले आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. पाहा तुमच्या शहरातील सोने व चांदीचे दर…

Gold Silver Rate

Gold Silver Rate today 23 December 2023 : आज सोने व चांदीच्या दरात किंचित बदल झाला आहे. सोने महागले आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. पाहा तुमच्या शहरातील सोने व चांदीचे दर…

  • Gold Silver Rate today 23 December 2023 : आज सोने व चांदीच्या दरात किंचित बदल झाला आहे. सोने महागले आहे, तर चांदी स्वस्त झाली आहे. पाहा तुमच्या शहरातील सोने व चांदीचे दर…

Gold Silver Rate Today in Mumbai : सोने व चांदीच्या दरात रोजच्या रोज काही प्रमाणात चढउतार सुरूच आहे. आज सोन्याच्या दरात किंचिंत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव आज २६० रुपयांनी वर गेला आहे. तर, चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

icici vs axis bank : आयसीआसीआय बँक की अ‍ॅक्सिस बँक? कोणता शेअर जास्त चांगला आणि का?

Income tax filing : पगारदार करदाते असाल तर 'या' पाच गोष्टी नीट लक्षात ठेवा, अन्यथा होईल मनस्ताप

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

मुंबईत दहा ग्रॅम अर्थात एक तोळ्यासाठी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६३,४९० रुपये आहे. कालच्या तुलनेत हा भाव २६० रुपयांनी अधिक आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या सर्व शहरात आज सोन्याचा भाव सारखाच आहे.

IPO Market 2024 : पैसे जपून ठेवा! स्विगीपासून ओला, ओयोपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांचे आयपीओ येतायत

एक किलो चांदीचा भाव ५०० रुपयांनी घसरून ७९००० रुपयांवर आला आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांतही किलोमागे चांदीचा भाव ७०,००० रुपये इतकाच आहे.

महाराष्ट्रात सोन्याचा आजचा दर

२४ कॅरेट - ६३,४९० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

२२ कॅरेट - ५८,२०० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

१८ कॅरेट - ४७,६२० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

सोने-चांदीच्या दरात चढउतार का होतात?

भारतात सर्वसाधारणपणे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोने व चांदीचे भाव निश्चित करते. त्यासाठी काही घटकांचा आधार घेतला जातो. सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांना अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील घटकही कारणीभूत असतात. मोठ्या शहरांमध्ये त्या-त्या शहरांतील मोठे व्यापारी भाव निश्चित करतात.

Stocks To Watch in 2024 : पुढच्या वर्षात हे १० शेअर देऊ शकतात दणदणीत नफा, एक्सपर्ट्सचीही पसंती

जगभरात असलेली सोन्याची मागणी, देशा-देशांच्या चलनमूल्यातील फरक, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंदर्भातील सरकारी नियम या सर्व बाबी भावांमधील चढउतारास कारणीभूत ठरतात. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद याचाही सोने व चांदीच्या किंमतीवर परिणाम होत असतो.

दरांतील चढउताराचा प्रवास

मुंबईतील चांदीचे दर गेल्या काही वर्षांपासून घसरलेले आहेत. २००८ साली लेहमन ब्रदर्सच्या संकटानंतर चांदीचे दर वाढले. पुढं त्यात सतत वाढ झाली. गेल्या काही वर्षांत ते पुन्हा स्थिरावले आहेत. अलीकडच्या काळात लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं आहे. त्याचा परिणाम सोने व चांदीतील गुंतवणूक, मागणी व पर्यायानं दरावर झाला आहे. मात्र, २०१८ पासून मुंबईतील सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार पुन्हा सोने व चांदीकडं वळल्याचा हा परिणाम आहे.

विभाग

पुढील बातम्या