मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Price Today : एसव्हीबी इम्पॅक्ट, सोने चांदीमध्येही थरथराट ! किंमतींमध्ये वाढ

Gold Silver Price Today : एसव्हीबी इम्पॅक्ट, सोने चांदीमध्येही थरथराट ! किंमतींमध्ये वाढ

Mar 14, 2023, 08:59 AM IST

    • Gold Silver price today 14 March 2023 : एमसीएक्सवर सोन्याच्या किंमती आॅल टाईम हायवर पोहोचल्या आहेत. फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षा आणि एसव्हीबी बँक डबघाईचा परिणम सोने चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींत वाढ झाली आहे.
Gold HT

Gold Silver price today 14 March 2023 : एमसीएक्सवर सोन्याच्या किंमती आॅल टाईम हायवर पोहोचल्या आहेत. फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षा आणि एसव्हीबी बँक डबघाईचा परिणम सोने चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींत वाढ झाली आहे.

    • Gold Silver price today 14 March 2023 : एमसीएक्सवर सोन्याच्या किंमती आॅल टाईम हायवर पोहोचल्या आहेत. फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षा आणि एसव्हीबी बँक डबघाईचा परिणम सोने चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींत वाढ झाली आहे.

Gold Silver price 14 March : एमसीएक्सवर सोन्याच्या किंमती आॅल टाईम हायवर पोहोचल्या आहेत. फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षा आणि एसव्हीबी बँक डबघाईचा परिणम सोने चांदीच्या किंमतींवर दिसून येत आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतींत वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात सोन्याच्या किंमती ६० हजार रुपये प्रती तोळ्यावर पोहोचू शकतात. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमती ५ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचून अंदाजे ५७३७० रुपये प्रती तोळ्यांवर बंद झाल्या.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कालच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ५२६०० रुपये प्रती तोळा आहेत. काल त्या अंदाजे ५२३१० रुपये प्रती तोळा होत्या.त्यामुळे २२ कॅरेटसाठी सोन्याच्या किंमतीत आज २९० रुपयांची वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमती आज अंदाजे ५७३७० रुपये प्रती तोळा पोहोचल्या आहेत. काल त्या ५७०५० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज त्यात तब्बल ३२० रुपयांची वाढ झाली आहे.

चांदीच्या किंमतीतही आज वाढ झाली आहे. आज किंमत ६६००० रुपये प्रती किलो आहेत. काल त्या अंदाजे ६५७०० रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किंमतीतही ३०० रुपयांची वाढ झाली आहे.

सोने चांदीचे दर असे निश्चित केले जातात (Gold Silver)

भारतातील सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार ठरवली जाते. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. मात्र, ही मध्यवर्ती संरचना आहे. यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये इतर काही शुल्कासह दर निश्चित केला जातो आणि त्यानंतर किरकोळ विक्रेता दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस आकारून त्याची विक्री करतात.

एसएमएसवर जाणून घ्या सोने चांदीचे दर (Gold Rates on SMS)

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर मिळेल. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी आयबीजेएच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

विभाग

पुढील बातम्या